आळंदीतील इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जनास बंदी

राज्यात कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. आळंदीसह लगतच्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

आळंदी (खेड): पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आळंदी-देवाची (ता. खेड) येथील पवित्र इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र स्थानिक नागरिकांना यामधून सूट देण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून इंद्रायणी नदीत परगावातील नागरिकांना अस्थी विसर्जन करण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती. अखेर आज (शुक्रवार) पालिकेकडून त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे.

शिक्रापूरमध्ये कोविड सेंटर चालवणारा डॉक्टर निघाला बोगस

राज्यात सध्या कोविड - १९ ची दुसरी लाट आली असून, या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून राज्यात कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. आळंदीसह लगतच्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणांहून नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

पेरणे फाटा येथे चारित्र्याच्या संशयातून युवतीचा खून

यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून ते पुढील आदेश होईपर्यंत स्थानिक वगळून अन्य नागरिकांवर इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलिस अधिनियम १९५१, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे मुख्याधिकारी अंकुश जाधव व वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.

भयानक! अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग...

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

कोरोना लस घ्यायची असेल; तर करा येथे रजिस्ट्रेशन!

शिरूर तालुक्यात कोठे बेड आहे का बेड...

शिरूर तालुक्यात आणखी एक कोविड सेंटर सुरू; कोठे ते पाहा...

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

विरारमध्ये 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू; पाहा मृतांची नावे...

Image

Title: shirur taluka news corona aalandi municipal taken decision
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे