डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया. आपण आपली प्रतिक्रिया shirurtaluka@gmail.com च्या माध्यमातूनही मांडू शकता.

शिरूरः राज्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये अनेक रुग्णांना आणि नातेवाईकांना वेगवेगळे अनुभव येत आहेत. किंबहुणा काही ठिकाणी चांगले तर काही ठिकाणी वाईट. ठिकठिकाणी डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे डॉक्टर रुग्णांना लुटत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. काही रुग्ण आपली कैफीयत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत आहेत.

शिरुर तालुक्यातील कोरोना रुग्णाने शेअर केला हॉस्पिटलमधील धक्कादायक अनुभव...

Image

शिरूर तालुक्यात मोफत धान्य योजनेमध्ये मोठा घोटाळा...

कोरोनाच्या दुसऱया लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेकांचा जीव वाचला सुद्धा आहे. कोरोनाच्या काळात अनेकांना चांगल्या-वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. ज्या डॉक्टरांमुळे रुग्णांचे प्राण वाचले त्यांचे जरूर कौतुक व्हायला पाहिजे. पण, जर काही डॉक्टरांचा अनुभव वेगळा आला असेल तर तो सुद्धा समाजापुढे नक्कीच यायाला हवा.

शिक्रापूरमधील 'त्या' बोगस डॉक्टरला कोरोनाची लागण

Image

बोगस डॉक्टर शंका येऊ नये म्हणून काय करायचा पाहा...

ठिकठिकाणी बोगस डॉक्टरांचे जाळे निर्माण झाले आहे. बोगस डॉक्टर बनून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. शिरूर तालुक्यातच बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात अनेकांना आपले नातेवाईक गमवावे लागले आहेत. तुम्ही तुमचे चांगले-वाईट अनुभव प्रतिक्रियांच्या माध्यमातून जरूर मांडा. www.shirurtaluka.com या वेबसाईटच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण करून देत आहोत. तुमच्या अनुभवांचा इतरांना नक्कीच उपयोग होईल. डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

कारेगावमधील डॉ. महेश पाटील या बोगस डॉक्टरचा प्रवास पाहा...

कोरोनाची लागण झालेले वैभव चौधरी यांनी करडे येथील बांदल हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटलमधील अनुभव फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल केला आहे. यानंतर अनेकजण आपल्या तक्रारी मांडू लागले आहेत.

तुमचे सुद्धा काही चांगले-वाईट अनुभ असतील तर shirurtaluka@gmail.com च्या माध्यमातूनही मांडू शकता.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

Image

कारेगावमधील बनावट डॉक्टरचा आणखी एक 'प्रताप' उघडकीस

शिरूर तालुक्यातील मोरया हॉस्पिटलचा डॉक्टर निघाला बोगस

Title: shirur taluka news corona time doctor experience to patient