'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' व्हॉटसऍप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी!

समाजाचे आपण काहीतरी देण लागतो, या भावनेतून मांडवगण फराटा व उरळगाव येथील कोवीड सेंटरला मदत केली आहे, असे दत्त देवस्थानचे अध्यक्ष अॅड गणेशराव करपे यांनी सांगितले.

शिरूरः श्री क्षेत्र दत्त पंढरी गुनाट (ता. शिरूर) येथील 'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' या व्हॉटसऍप ग्रुपने मांडवगण फराटा व उरळगाव येथील कोवीड सेंटरला 34 हजाराचे अत्यावश्यक साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जपून सोशल मीडिया बाबत एक आदर्श घालून दिला आहे.

कोरोना बाधित दाम्पत्यांच्या बालकांना मिळणार 'माहेर'चा आधार!

'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' ग्रुप मध्ये नेहमी दत्त मंदीर जिर्णोद्धार, दत्त माध्यमिक हायस्कूल व गावच्या हितासाठी विचारांची देवाणघेवाण होत असते. या ग्रुपमध्ये वरीष्ठ पोलिस निरीक्षक कल्याणराव करपे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका मध्ये कार्यरत असलेले अभियंता दिपक करपे यांचे  मार्गदर्शन लाभत असते. 'माझ गाव माझ तिर्थक्षेत्र' ग्रुपच्या वतीने सध्या कोरोनाच्या परिस्थितीत रुग्णांची सेवा घडावी, या उद्देशाने 34 हजाराचे खाद्य पदार्थ व अत्यावश्यक साहित्य मांडवगण फराटा व उरळगाव कोविड सेंटरला कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता अशोक पवार तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विकास शिवले यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

बाभूळसर बुद्रुक येथील दोन सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू

समाजाचे आपण काहीतरी देण लागतो, या भावनेतून मांडवगण फराटा व उरळगाव येथील कोवीड सेंटरला मदत केली आहे, असे दत्त देवस्थानचे अध्यक्ष अॅड गणेशराव करपे यांनी सांगितले. मांडवगण फराटा येथे दत्तात्रय फराटे, बाळासाहेब फराटे, धनुभाऊ फराटे, संभाजी फराटे, सरपंच शिवाजी कदम, गुनाट येथील अॅड गणेश करपे, माजी सरपंच गहिनीनाथ डोंगरे, विष्णू करपे, ग्रामपंचायत सदस्य सतीश सोनवणे, संतोष भगत, तुषार भगत, कृषी सहायक जयवंत भगत उपस्थित होते. या उपक्रमात वरीष्ठ पोलिस निरीक्षक कल्याण करपे व पिपरी चिंचवड महानगर पालिका मध्ये कार्यरत असलेले अभियंता दिपक करपे यांचा मोठा वाटा राहिला आहे, असे कृषी सहायक जयवंत भगत यांनी सांगितले.

कोरोना बाधित शिक्षकाच्या मदतीसाठी विद्यार्थी आले धावून...

May be an image of text

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

Title: shirur taluka news maze gaon maze tirthkshetra whatsapp grou
प्रतिक्रिया (1)
 
जयवंत दत्तात्रय भगत
Posted on 14 May, 2021

एक चांगल्या कार्याला आपण बातमी देऊन एक प्रकारचे प्रोच्छाहन दिले आहे यामुळे अनेकांना चालना मिळेल आणि त्यातून कोविड सेंटर ला मदतीचा ओघ सुरू राहिल हा खात्री आहे मनापासून तेजसराव आपणास धन्यवाद सह आभार

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे