...म्हणून अलिशाने केले आमदारांच्या गाडीचे सारथ्य!

कार्यकर्त्याच्या मुलीचा हट्ट आमदार अशोक पवारांनी केला पुर्ण

आमदारांनी अलिशाकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का...? याची खातरजमा करत लगेचच होकार देत अलिशा बरोबर सणसवाडी ते शिक्रापूर असा प्रवास केला.

रांजणगाव गणपती: आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा शिरुर-हवेलीचे आमदार ऍड अशोक पवार कायमच मान ठेवतात. मग कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव रात्री ११:३० वाजता कंपनीचे उदघाटन असो किंवा अन्य काही कारण असो. कार्यकर्त्यांना भावना ते जपत असतात. अशाच एका कार्यकर्त्याच्या कन्येच्या आग्रहास्तव आमदारांनी सणसवाडी ते शिक्रापूर दरम्यान प्रवास करत त्या मुलीची इच्छा पुर्ण केली. विशेष म्हणजे आमदारांच्या गाडीचे सारथ्य अलिशा पंडित दरेकर हिने केले.

...भेट म्हणून आमदार साहेबांना दिली भेळ!

आमदार पवार हे नुकतेच सणसवाडी येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. सणसवाडी येथील पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर यांची कन्या अलिशा हिची इच्छा होती की माझ्या गाडीत आमदार अशोक पवार यांनी एकदातरी बसावे. हि इच्छा तिने आपले वडील पंडित दरेकर यांना बोलून दाखवली. पंडित दरेकर हे अशोक पवारांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे त्यांनी आमदारांना हि गोष्ट सांगितली. 

लेकीच्या वाढदिवसादिवशी आमदार पवार यांची भावनिक पोस्ट

आमदारांनी अलिशाकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का...? याची खातरजमा करत लगेचच होकार देत अलिशा बरोबर सणसवाडी ते शिक्रापूर असा प्रवास केला. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान अलिशाला वाहन चालविण्या संदर्भात विशेष मार्गदर्शन केले. त्यामुळे अलिशाची आमदारांचे सारथ्य करण्याची इच्छाही पूर्ण झाली.

कार्यकर्त्याच्या प्रेमापोटी आमदारांची कार्यक्रमाला हजेरी

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka news mla ashok pawar and alisha darekar drivin