...अन्यथा महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलनः अजयशेठ गायकवाड

वीज पुरवठा मधील अडथळे कायमस्वरूपी दूर न झाल्यास महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा उद्योजक अजयशेठ गायकवाड यांनी महावितरणला दिला आहे.

कोंढापुरीः कोंढापुरी येथील एक्सप्रेस फिडर वरील कारखानदार व व्यवसायिक वीज ग्राहक विजेच्या वारंवार अडथळ्यामुळे चिंतेत असून, वीज पुरवठा मधील अडथळे कायमस्वरूपी दूर न झाल्यास महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा उद्योजक अजयशेठ गायकवाड यांनी महावितरणला दिला आहे.

शिरूर तालुक्यातील ६३ गावात कोरोनाचे किती रुग्ण पाहा...

रांजणगाव एमआयडीसी येथून कारखानदारांसाठी व व्यवसायिक वीज ग्राहकांसाठी एक्सप्रेस लाईनद्वारे 24 तास वीज पुरवठा केला जात आहे. या एक्सप्रेस फिडर कोंढापुरी व पंचक्रोशीतील अनेक कारखाने व व्यवसायिक वीज ग्राहक असून, गेल्या एक वर्षापासून वीज पुरवठा मध्ये असंख्य अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत शिक्रापूर, केडगाव विभाग व बारामती विभागातील महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत वेळोवेळी माहिती देऊन ही वीज पुरवठा मध्ये कोणत्याही सुधारणा होत नाही.

सणसवाडीतील चिन्मय ऑक्सिजनचा किती रुग्णालयांना होणार पुरवठा पाहा...

काही कारखानदारांनी व व्यवसायिकांनी वैयक्तिक रक्कम खर्च करून एक्सप्रेस फिडर लाईन ओढून घेतलेले आहेत. याचाही कोणता मोबदला महावितरण कंपनी देत नाही. ज्याला गरज आहे त्यांनी कनेक्शन घ्या, अशी आडदांड भूमिका महावितरण कंपनीची आहे. वीज पुरवठा बंद करण्याचे कोणतेही वेळापत्रक महावितरण कंपनी देत नाही. दिवसातून दहा ते पंधरा वेळा विद्युत पुरवठा खंडित होतो. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कारखान्यातील असणाऱ्या मशीन बंद झाल्याने त्या मशीन चालू होण्यासाठी खूप वेळ खर्च जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ गेल्याने कामगारांचा असणारा पगार यांचा खर्च व मशीनचा खर्च याची मोठी हानी कारखानदारांच्या व्यवसायिकांच्या पदरी पडत आहे.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

गणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर!

याबाबत वारंवार महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिलेली आहे. शिवाय, अनेक वेळा बैठकाही घेण्यात आल्या होत्या. अनेक वेळा महावितरण कार्यालय शिक्रापूर केडगाव व बारामती यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील कोणत्याही वीज पुरवठ्यामध्ये मध्ये सुधारणा होत नाही. कारखानदारांना असणाऱ्या मोठ्या बिलामध्ये कोणतीही सूट मिळत नसून, वेळोवेळी नियमितपणे वीजबिले कारखानदारांकडून वसूल केले जातात. त्याप्रमाणे सोयीसुविधा महावितरणकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. वीज पुरवठा मध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाल्यामुळे कारखानदारांना मोठ्या प्रमाणात जनरेटरचा वापर करावा लागतो. त्यामुळे मोठी आर्थिक हानी सहन करावी लागत आहे.

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून बसेसवर कारवाई

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

याबाबत महावितरण कंपनीने तातडीने कोणते उपाय योजना केल्या नाही तर महावितरणच्या विरोधात कारखानदार व व्यवसायिक वीजग्राहक इतर ग्राहकांच्या बरोबर महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, याबाबतचा इशारा उद्योजक अजयशेठ गायकवाड यांनी महावितरणला दिला आहे. शिवाय, कोंढापुरी येथील सर्व कारखानदार व वीज ग्राहकांच्या वतीने वीज महामंडळाच्या अधिकाऱयांना निवेदन दिले आहे.

Video: आईला तडफडत असताना मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: shirur taluka news mseb issue business man ajayseth gaikwad
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे