मानसिंग पाचुंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त 'फ्रंटलाईन वर्कर'ना किट भेट!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी गेल्या वर्षीच्या कोरोना काळात गरीब व गरजू व्यक्तींना सुमारे २१ लाख रुपयांचे ३००० किराणा वस्तूंचे किट दिले होते.

रांजणगाव गणपती: कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणारे आरोग्य सेवक व पत्रकार यांना रांजणगाव गणपती  (ता. शिरुर) येथील राजमुद्रा उद्योग समुहाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत संरक्षण म्हणून आरोग्य साहित्य किट देण्यात आले.

कोरोनाने गेलेल्या मित्राच्या कुटुंबाला मदतीसाठी सरसावला गाव...

आंबेगाव-शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांच्या वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून राजमुद्रा उद्योग समूह व मानसिंग पाचुंदकर मित्र परिवाराच्या वतीने कोरोनाच्या काळात कोरोना योद्धे म्हणून कर्तव्य बजावणारे शिरुर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटर मधील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका आणि पत्रकार बंधू यांना संरक्षण म्हणून आरोग्य साहित्य किट देण्यात आले. या किटमध्ये ऑक्सिमीटर, एन ९५ मास्क, सॅनिटायझर, हॅन्डवॉश, हॅन्डग्लोज व अर्सेनिक अल्बम गोळया यांचा समावेश होता. पाचुंदकर यांच्या वतीने शिरूर तालुक्यातील कायम विनानुदानित माध्यमिक शाळांना आरोग्य सुरक्षा किट भेट देण्यात आले. रांजणगाव गणपती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले.

गावकऱ्यांनो, गाव कोरोनामुक्त करा 50 लाख जिंका...

May be an image of text

शिरुर तालुक्यातील युवक ठरतोय राज्याचे आकर्षण!

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल घोड़ेराव, डॉ.महेश सातव, राजमुद्रा उद्योग समूहाचे संचालक ज्ञानेश्वर पाचुंदकर, युवा उद्योजक सचिन दूंडे, कारेगावचे माजी उपसरपंच राजेंद्र नवले, युवा उद्योजक गणेश लांडे, अनिल दुंडे, युवा उद्योजक निलेश लांडे, मोहन शेळके, रांजणगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य विलास फंड, खंडाळेचे ग्रामपंचायत सदस्य गहिनीनाथ नरवडे, विठ्ठल नळकांडे, केंदुरचे ग्रामपंचायत सदस्य सुनिल थिटे युवा उद्योजक राजेंद्र शेळके, युवा उद्योजक विजय खेडकर, शरद चौधरी आदि उपस्थित होते.

सरकारचा खासगी हॉस्पिटल्सना दणका, कोविड उपचारासाठी दर जाहीर

Image

कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या डॉक्टरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

दरम्यान, पाचुंदकर यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून युवा उद्योजक निलेश लांडे, विजय खेडकर, मिलिंद गायकवाड, माऊली मोटे, अतुल पाचुंदकर व पाराजी पाचुंदकर यांच्या वतीने रांजणगाव एमआयडीसी व टाकळी हाजी येथील कोविड सेंटर येथे मास्क व सॅनिटायझर देण्यात आले.

शिरुर तालुक्यातील कोरोना रुग्णाने शेअर केला हॉस्पिटलमधील धक्कादायक अनुभव...

सामाजिक बांधिलकी...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी गेल्या वर्षीच्या कोरोना काळात गरीब व गरजू व्यक्तींना सुमारे २१ लाख रुपयांचे ३००० किराणा वस्तूंचे किट दिले होते. यापूर्वीही दुष्काळग्रस्ताना पाणी टँकर, जनावरांच्या चारा छावण्याना चारा वाटप यासारखे विधायक उपक्रम पाचुंदकर सातत्याने राबवित असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिरूर रेशनिंग दुकानदार आणि पुरवठा विभाग यांचे आर्थिक साटे-लोटे?

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka news ncp mansing pachundkar birthday frontline
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे