पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

महागणपती व्यापारी संघटनेचे जवळपास १००-१५० प्रतिनिधी हजर राहून रांजनगाव ग्रामपंचायतीस निवेदन दिले आहे. यावेळी सरपंच व उपसरपंच यांनी व्यावसायिकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

शिरूरः कोरोना काळात अत्यावश्यक व्यवसायासह इतर आस्थापने चालू करण्याबाबत परवानगी मिळावी. शिवाय, सर्व वयोगटातील व्यापारी वर्गाला कोरोनाची लस मिळावी, याबाबत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ सलग्न महागणपती व्यापारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती महागणपती व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे (मातोश्री उद्योग समूह) यांनी माहिती दिली.

एक यशस्वी उद्योजक: किरण शिंदे...

निवेदनात म्हटले आहे की, 'कोरोनामुळे गेल्या सव्वा वर्षांपासून लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये सरासरी सहा महिने स्थानिक पातळीवर व्यवसाय बंद राहिला आहे. जिवनावश्यक व्यवसाय सोडून इतर व्यवसायांना परवानगी मिळालेली नाही. यामुळे व्यापारी वर्गाला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. वीज बिल, कामगारांचे पगार, दुकान भाडे, साहित्य खराब होणे, टॅक्स, बॅंक, पतसंस्थांचे कर्ज, दंडात्मक कारवाई असा मोठा त्रास व्यापारी वर्गाने सहन केला आहे.'

पुणे शहरासह जिल्ह्याबाबत अजित पवार यांची मोठी घोषणा...

'कोरोना रुग्णांची संख्या सध्या कमी झाली आहे. शिवाय, जे इतर व्यवसाय बंद आहेत, त्यांचा तसाही व्यवसाय नसल्याने दुकानात गर्दी होत नाही. परंतु, आपण परवानगी दिल्यास व्यवसायाला थोडाफार आधार मिळेल. व्यापारी वर्गाने वेळोवेळी स्वःताचे रक्षणाबरोबरच नागरिकांचे सुद्धा रक्षणार्थ मास्क, हण्डग्लोज, सॅनिटायजर, सोशल डिस्टन्सचा उपयोग केला आहे. यापुढेही काळझी घेऊ. कोरोना काळात व्यापारी वर्गाने स्वःताच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना घरपोच सेवा उपलब्ध करून दिली आहे. यापुढेही शासनासोबत काम करण्यास सकारात्मक दृष्टीकोन ठेवून व्यवसाय करण्यास तयार आहोत. आपण स्थानिक पातळीवर इतर व्यवसाय करणारे सर्व व्यापारी वर्गाला व्यवसाय करण्यासाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत परवागन द्यावी. शिवाय, सर्व व्यावसायिकांना लसीकरण करण्यास प्राधान्य देण्यात यावे,' अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

शिरुर येथील शिबिरामध्ये २५० मुलांची मोफत आरोग्य तपासणी...

May be an image of text that says

...अन कंटेनर गेला रस्ता दुभाजकावर

दरम्यान, महागणपती व्यापारी संघटनेचे जवळपास १००-१५० प्रतिनिधी हजर राहून रांजनगाव ग्रामपंचायतीस निवेदन दिले आहे. यावेळी सरपंच व उपसरपंच यांनी व्यावसायिकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दोन दिवसात काहीतरी चांगला निर्णय येईल, तो पर्यंत व्यापाऱ्यांनी सर्व नियमाचे पालन करावे, अशा सुचना केल्या आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka news pune district businessman letter to colle