कोरेगाव भीमा विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाची तयारी सुरु

शिक्रापूर पोलिसांचे हद्दीतील ग्रामपंचायतींना पत्र...

पोलिसांनी प्रत्येक वर्षीप्रमाणे तयारी सुरु केलेली असून, परिसरातील ग्रामपंचायतींना शिक्रापूर पोलिसांकडून पत्र देण्यात येत आहे.

शिक्रापूर: एक जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराला चार वर्ष पूर्ण होत आहे. एक जानेवारी रोजी होणारा शौर्यदिन रोजी होणारा विजय रणस्तंभ मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी परिसरातील सर्व ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी शांतता टिकविण्यासाठी पुढाकार घेत मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक वर्षीप्रमाणे तयारी सुरु केलेली असून, परिसरातील ग्रामपंचायतींना शिक्रापूर पोलिसांकडून पत्र देण्यात येत आहे.

कासारी फाट्याहून शेतकऱाचे पैसे लांबविले...

कोरेगाव भीमा, पेरणे येथे एक जानेवारी या शौर्यदिनी विजय रणस्तंभाला अभिवादन करत मानवंदना करण्यासाठी येणाऱ्या समाज बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक वर्षी परिसरातील कोरेगाव भीमा, पेरणे, लोणीकंद, सणसवाडी, शिक्रापूर, वढू बुद्रुक या ग्रामपंचायती पुढाकार घेत असतात. दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतच्या वतीने सर्व समाजबांधवांना पिण्याचे शुद्ध पाणी, नाष्टा, जेवण, पार्किंग, फिरते शौचालय या सुविधा सर्व समाज बांधवांना देत समाजबांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत असते. जिल्हा प्रशासन या कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे नियोजन करत असते. मागील वर्षी कोरोना मुळे कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला आहे. यावर्षी कोरोनाचे सावट संपत असताना मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होण्याची शक्यता असताना आता पोलिसांनी सदर कार्यक्रमासाठी तयारी सुरु केलेली आहे.

शिरूर तालुक्यात उसतोड दरम्यान आढळला मानवी सांगाडा...

सध्या शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या वतीने परिसरातील ग्रामपंचायतींना पत्र देण्यात येत असून, त्याद्वारे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, हद्दीतील अनधिकृतपणे लावलेले फ्लेक्स काढून टाकावे, फ्लेक्स लावण्यासाठी परवानगी बंधनकारक करावी, एक जानेवारीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गावामध्ये आक्षेपार्ह फ्लेक्स लागणार नाही याची काळजी घ्यावी, जिल्हाधिकारी कार्यालय कडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, गावातील परिसर स्वच्छ ठेवावा, गावातील पथदिवे सुरु ठेवावे, ग्रामपंचायतचे कर्मचारी कोणत्याही वेळी उपस्थित राहतील असे नियोजन करावे अशा सूचना पोलिसांच्या वतीने सदर ग्रामपंचायतींना करण्यात आल्या आहेत.  नागरिकांनी सोशल मिडियावर येणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे देखील अनेक ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे. प्रत्येक गावामध्ये ग्रामस्थ हे प्रशासनाच्या खांद्याला खांदा लाऊन होणारा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

मांडवगण मधील एटीएम मशिनवर दरोडा टाकणाऱयांना अटक

भीम बांधवांमध्ये वाढ होणार...
विजय रणस्तंभ मानवंदना कार्यक्रम मागील वर्षी कोरोनामुळे मर्यादित प्रमाणात झालेला होता मात्र आता यावर्षी कोरोनाचे सावट दूर झालेले असून या वर्षी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित राहू शकतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते असे असे कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले.

Video: शिरूर तालुक्यात मठावर छापा; गांजा अन् शिंगे जप्त...

पत्नीच्या हत्येनंतर विष प्यायलेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka news shikrapur police letter to grampanchayat