सोशल डिस्टंसिंग: नवरा-नवरीने काठ्यांच्या मदतीने घातले गळ्यात हार

एका विवाहात सोशल डिस्टंसिंग नियम पाळत नवरा नवरीने काठ्यांच्या मदतीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले आहे. संबंधित छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पाटणा (बिहार): देशात कोरोनाने हाहाकार माजवला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला असून, विवाहांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. एका विवाहात सोशल डिस्टंसिंग नियम पाळत नवरा नवरीने काठ्यांच्या मदतीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले आहे. संबंधित छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Video: आईला तडफडत असताना मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन

कोरोना काळात सोशल डिस्टंसिंग आणि मास्क लावण्याची गाइडलाईन जारी केली आहे. अशाप्रकारे काही लोक लग्नात नियमांचे पालन करून इतरांना जागरूकही करत आहे. नवरदेवाने सांगितले की, काठ्यांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातल्यामुळे लग्न यादगार राहणार आहे. या लग्नात नियमानुसार परिवारातील केवळ ५० लोकच उपस्थित होते आणि पूर्ण नियमानुसार सरकारी गाइडलाईन पालन करत हे लग्न पार पाडले. लग्नात सामिल झालेले आणि सोशल मीडियावरील लोक या कपलची प्रशंसा करत आहेत. हे अनोखं लग्न तेघडा अमुमंडल परिसरातील तेघरा बाजारात पार पडले.

दरम्यान, काठ्यांच्या मदतीने दोघांनी एकमेकांना हार घातल्याने हे लग्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोरोना काळात सर्वच लग्नांमध्ये चित्र बदलेलले दिसत आहे. पाहुण्यांना फुलांऐवजी मास्क आणि सॅनिटायजर दिले जात आहे. त्यासोबतच लग्नात वेगवेगळ्या आयडिया लावल्या जात आहेत. काही ठिकाणी तर व्हिडिओ कॉलवरून लग्ने लागली आहेत. शिवाय, पाहुणे मंडळही व्हिडिओच्या माध्यमातूनच उपस्थिती लावत आहेत.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

गणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर!

भयानक! अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग...

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: shirur taluka news social distancing and wedding bride and g
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे