शिरूर रेशनिंग दुकानदार आणि पुरवठा विभाग यांचे आर्थिक साटे-लोटे?

शिरूर पुरवठा म्हणजे 'आंधळे दळतय आणि कुत्रे पीठ खातंय...'

दुकानदार आणि पुरवठा विभाग यांचे आर्थिक साटे-लोटे असल्यामुळे प्रत्येक वेळेला दुकानदारांना वाचविण्याचा प्रयत्न केला जातो कि काय ? असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

सादलगाव (शिरूर) : रेशनिंग वाटपात आपल्या सोईने वाटप करून होता होईल तेवढा हात मारून झाला तरी शिरूर पुरवठा विभागाकडून मात्र झोपेचे सोंग घेतले जात असून, जाणीवपूर्वक कारवाई करण्यास उशीर लावला जात आहे.

शिरूर तालुक्यात मोफत धान्य योजनेमध्ये मोठा घोटाळा...

दुकानदारांनी चालू महिन्याचा रेशनिंग कोटा उचल्यानंतर तो नागरिकांना योग्य मिळतो कि नाही ? हे पाहण्यासाठी शिरूर येथे स्वतंत्र पुरवठा विभाग असून त्यावर एक अधिकारी नियुक्त आहे. दुकानदारांना धान्य देऊन झाल्यानंतर पुरवठा विभाग चौकशीसाठी कार्यालयाच्या बाहेर पडण्यास तयार नाही. दुकानदारांना आता सर्व रान मोकळे झाले आहे. तालुक्यातील अनेक गावांनी तीन ते पाच दिवसांत रेशनिंग वाटप पूर्ण करण्याच्या विक्रम केला आहे. धान्य वाटप केल्यानंतर लाभार्थींची सही घेण्याचे बंधनकारक असताना काही दुकानदारांनी सह्याच घेतलेल्या नाहीत.

डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

Image

शिरुर तालुक्यातील कोरोना रुग्णाने शेअर केला हॉस्पिटलमधील धक्कादायक अनुभव...

दुकानदार आणि पुरवठा विभाग यांचे आर्थिक साटे-लोटे असल्यामुळे प्रत्येक वेळेला दुकानदारांना वाचविण्याचा प्रयत्न केला जातो कि काय ? असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. धान्य कसे पचवायचे आणि बायचान्स सापडलो तर कसे सुटायचे यासाठी तालुक्यातील काही दुकानदार माहीर झाले आहेत.  गेल्या वर्षीच्या कोरोना काळात धाड टाकून वाटपाविना लपून ठेवलेला गहू-तांदूळ पंचनामा करून झाल्यानंतर सुद्धा दुकानदारांवर अदयाप कायदेशीर कारवाई झालेली नाही. शिरूर पुरवठा विभागाचा कारभार म्हणजे 'आंधळे दळतय आणि कुत्रे पीठ खातंय' असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. लाभार्थ्यांना वाटप बरोबर झालेले नाही. यामधील घोटाळा शोधून कारवाई करा, अशी जनतेचे मागणी आहे. अन्यथा ज्या अधिकाऱ्यांनी रेशनिंग घोटाळा करून दुकानदाराला पाठीशी घेतले आहे, त्यांची चौकशी लावून, त्यामध्ये काही तथ्य आढळ्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

महाराष्ट्र होणार चार टप्प्यात अनलॉक? कसा तो जाणून घ्या...!

Image

गरजू व गरीब रुग्णांसाठी सिटीस्कॅनचे दर केले निम्म्यांहून कमी...

करोनाच्या भीतीने कारवाईस उशीर...
दरम्यान, शिरूरचे नायब तहसिलदार ज्ञानदेव यादव यांना कारवाईबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि, कोवीडमुळे कारवाईवर मर्यादा येत आहे, परंतु आम्ही पुढील महिन्यात वाटपावर चांगले लक्ष देऊन वाटप सुरळीत करू, असे सांगितले.

Title: shirur taluka ration news big scam in free grain scheme coro
प्रतिक्रिया (1)
 
Nilesh pawar
Posted on 25 May, 2021

सर्व दुकानदार आणि अधिकारी यांचे साटे लोटेच आहे online जेवढे आहे तेवढे ते देत नाही जाब विचारले कि उडवाउडविचि उत्तरे देतात

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे