श्री. तानाजी धरणे यांच्या कविता...

नोकरी सांभाळत साहित्य व काव्य हा त्यांचा आवडता विषय असल्याने वेळ मिळेल तेंव्हा कविता शब्दबध्द करण्याच्या छंदातून उत्तम काव्य निर्मिती झाली. त्यांच्या कवितांचा चाहता वर्गही मोठा आहे.

महिला महिमा....
कळली नाही तुला
तुझी अगनित रुपं
काळीज कसले ते
ते तर मोठं सुप..........!
आई माता भगिनी बेटी
सखी आणि मैत्रिण तु
अर्धांगिनी पार पाडते
उभी हयात तु..........!!
किती करारी आणि कणखर
बाणा आहेस तु
या संसार रुपी नावेतली
परीस आहेस तु.......!!!
अंतराळातील कल्पना आणि
रामायणातील सिता तु
ज्ञानेश्वरीतील ज्ञानेश्वरी आणि
भगवतगितेतील ' गिता 'तु....!!!!
सर्व आघाड्यावर ठसा उमठवला
बाकी ना ठेवले क्षेत्र कोणते
क्षितीजावर जाऊन ऊभा
क्षितिजय आपल्या कवेत व्यापले !!!!!

----------------------------
तुझी ओळख ........!!
जळणं तुझं
दिव्यावाणी
विझणं तुझं
वातीवाणी........
जिझणं तुझं
पाट्यावाणी
उधळणं तुझं
वार्‍यावाणी........
हसणं तुझं
झर्‍यावाणी
झुरणं तुझं
मोरावाणी.........
नजर तुझी
घारीवाणी
जन्म मात्र
नारी वाणी..........
सहवास तुझा
मुक्त शाळा    
मी गित
तु माझा गळा ...........!!!

तानाजी धरणे यांना साहित्यरत्न पुरस्कार

Title: shirur taluka tanaji dharne poem