शिरुर तालुक्यात भाद्रपदी पोळा मोठ्या उत्साहात साजरा

कृषीप्रधान संस्कृती मधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. यांत्रिकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झालाय. तरीही बळीराजाच्या जीवनात त्यांच स्थान कायम आहे. शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं गोड कौतुक करण्यासाठीच हा भाद्रपदी पोळ्याचा सण शिरुर तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

शिरुर: कृषीप्रधान संस्कृती मधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. यांत्रिकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झालाय. तरीही बळीराजाच्या जीवनात त्यांच स्थान कायम आहे. शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं गोड कौतुक करण्यासाठीच हा भाद्रपदी पोळ्याचा सण शिरुर तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरा  करण्यात आला.

राजकारणात संवाद हवा वाद नको:- सुजाता पवार

पोळ्याचे २ दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात. त्यांना अंघोळ घालून त्यांची रंगरंगोटी केली जाते. पुरणपोळी सारखा गोडधोड जेवणाचा नेवैद्य त्यांना दिला जातो. त्यानंतर वाजत-गाजत काही ठराविक बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली असून अनेकांनी घरीच बैलपूजा केली. यांत्रिकीकरणामुळे शेतीमधलं बैलांच महत्व कमी झालंय. तरीही अनेक शेतक-यांना मशागतीसाठी आजही बैलांवरच अवलंबून रहावं लागतंय. उन्हातान्हाची पर्वा न करता शेतात राबणा-या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे बैलपोळा.

कान्हूर मेसाईच्या विद्यार्थ्यांनी घेतली वन्य जीवांची माहिती

शिरुर तालुक्यात बैलपोळा सण कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गर्दी होणार नाही यासाठी काही ठराविक बैलांचीच पूजा मान्यवरांनी केली. तर अनेकांनी आपल्याला घरीच बैलांची पूजा करुन बैलपोळा सण साजरा केला. प्रसिद्ध गाडामालक प्रकाश माणिक गवारे यांनी आपल्या बैलगाड्यांच्या बैलांसह वाजत गाजत कारेगाव येथे बैलांची भंडा-याची उधळण करीत भव्य मिरवणूक काढून बैल पोळा साजरा केला. यावेळी बैलांची पुजा करुन त्यांना गोडधोड खाऊ घालण्यात आले. प्रकाश गवारे यांनी पत्नी सरस्वती यांच्यासह बैलांचे दर्शन घेतले. यावेळी पूजेला त्यांच्या सोबत त्यांचे चिरंजीव विजय व निलेश तसेच पुतणे तेजस व शुभम, रविराज आणि बंधू राहूल गवारे, बंडू गवारे, पोपट गवारे हे ही हजर होते.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Shirur Talukyat Bhadrapadi Pola Mothya Utshat Sajara