शिरुर तालुक्यात डी जे च्या तालावर नाचणे सरपंचाला भोवले

शिंदोडी येथे सोमवार (दि. २५) रोजी डी जे च्या तालावर मिरवणुक काढत गर्दी जमविल्याप्रकरणी गावचे कामगार तलाठी विजय बेंडभर यांनी याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन गावच्या सरपंचासह ९ जणांवर गुन्हे दाखल झाले असुन यात उपसरपंच यांच्या पतीचाही समावेश आहे.

शिरुर: शिंदोडी (ता. शिरुर) येथे सोमवार (दि. २५) रोजी शालेय शिक्षण समितीच्या निवडीनंतर सायंकाळी निवड झालेल्या काही सदस्यांची गावातुन डी जे च्या तालावर मिरवणुक काढत गर्दी जमविल्याप्रकरणी गावचे कामगार तलाठी विजय बेंडभर यांनी याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन गावच्या सरपंचासह ९ जणांवर गुन्हे दाखल झाले असुन यात उपसरपंच यांच्या पतीचाही समावेश आहे. त्यामुळे डी जे तालावर नाचणे सरपंचांना महागात पडले असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.  

शिरुर तालुक्यातील सरपंचांनी डीजेच्या तालावर धरला ठेका

सर्पमित्रांकडून विहिरीत पडलेल्या सापाला जीवदान

सणसवाडीत खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल

शिंदोडी गावात १५ दिवसांपुर्वी करोनाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असुन सध्या गावात करोनाचे २ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीच्या वेळेस गर्दी होऊ नये म्हणुन ग्रामस्थांनी शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना दोन पोलीस कर्मचारी पाठवावेत अशी मागणी केली होती. पोलीस कर्मचारी आल्याने निवडणुक प्रकिया शांततेत पार पडली. परंतु रात्री काही उत्साही कार्यकर्त्यांनी डी जे च्या तालावर थिरकत निवडून आलेल्या सदस्यांची मिरवणूक काढली. यात सोशल डिस्टन्सचा पुर्णपणे फज्जा उडाला. तसेच गावच्या सरपंचासह काही सदस्यांनीही डि जे च्या तालावर ठेका धरला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाले.

शिरुर तालुक्यात शेतातील ऊस चोरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

शिरसगाव काटा मध्ये तिघा बाप लेकांना मारहाण

शिरुरमध्ये युवकाला हातपाय बांधून मारहाण

महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रांना कोरोनाची लागण

याबाबत गावचे कामगार तलाठी विजय बेंडभर यांनी याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने सरपंच अरुण खेडकर, शिवम वाळुंज, इंद्रभान ज्ञानदेव ओव्हाळ, राजेंद्र खेडकर, शरद ओव्हाळ, अजित ओव्हाळ, दादासो चोरमले, अनिल पोपळघट, अनिल ओव्हाळ यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धनंजय थेऊरकर करत आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur talukyat dj chaya talawar nachane sarpanchala bhowale