शिरूर तालुक्यात लाच घेताना रंगेहात पकडले...

शिरुर येथील वनपरीक्षेत्र कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी पकडलेली सरपणाची (लाकडे) गाडी सोडवण्यासाठी आणि कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करुन ते पैसे स्वीकारताना शिरुर वनपरीक्षेत्र कार्यालयातील वनरक्षक व वनपाल यांना लाचलुचपत विभाग पुणे यांनी रंगेहात पकडले असल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर यांनी दिली.

शिरुर: शिरुर येथील वनपरीक्षेत्र कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी पकडलेली सरपणाची (लाकडे) गाडी सोडवण्यासाठी आणि कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करुन ते पैसे स्वीकारताना शिरुर वनपरीक्षेत्र कार्यालयातील वनरक्षक व वनपाल यांना लाचलुचपत विभाग पुणे यांनी रंगेहात पकडले असल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर यांनी दिली.   

शिरुर तालुक्यातील रस्त्यांच्या नूतनीकरणाची मागणी

शिरुर येथील वनविभागाच्या कार्यालयातील वनपाल सागर नवनाथ भोसले वनरक्षक संजय जयसिंग पावणे या दोघांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. याबाबत लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील शिरसागर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शिरुर तालुक्यातील आमदाबाद फाटा येथे दिनांक ३ नोव्हेंबर रोजी  दोन  कर्मचाऱ्यांनी सरपणाने (लाकडे) भरलेली गाडी पकडली होती. ही गाडी सोडवण्यासाठी व याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी एक लाख रुपयांची मागणी केली होती.     

शिरूर तालुक्यातील वाहन धारकांनो काळजी घ्या; काय चोरले पाहा...

याबाबत सरपणाच्या गाडीचे मालक यांनी लाचलुचपत विभाग पुणे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून आज शिरूर वनपरीक्षेत्र कार्यालय येथे तक्रारदार पंचा समक्ष शहानिशा करुन लाचलुचपत विभागाच्या पथकातील पोलिस निरीक्षक सुनील क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोरडे, श्रीराम शिंदे, अंमलदार दिनेश माने, प्रशांत वाळके, अभिजित राऊत यांनी सापळा रचून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना सागर भोसले व संजय पावणे यांना ताब्यात घेतले. याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात आला अन...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Shirur Talukyat Lach Ghetana Rangehat Pakdale