शिरुर तालुक्यात सततच्या पावसामुळे कांद्याच्या रोपांना बुरशीचा प्रादुर्भाव

शिरुर तालुक्यात रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच परतीच्या पावसामुळे खरीप कांदा पिकाला मोठा फटका बसला असुन सततच्या ढगाळ हवामानामुळे कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असुन कांद्याला पिळ पडणे, कांद्याच्या माना लांबणे, मूळकूज होणे असे प्रकार झाल्याने मोठ्या प्रमाणात औषधे आणि खतांचा खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

शिंदोडी: शिरुर तालुक्यात यावर्षी खरीप हंगाम जवळपास कोरडाच गेला. रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच परतीच्या पावसामुळे खरीप कांदा पिकाला मोठा फटका बसला असुन सततच्या ढगाळ हवामानामुळे कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असुन कांद्याला पिळ पडणे, कांद्याच्या माना लांबणे, मूळकूज होणे असे प्रकार झाल्याने मोठ्या प्रमाणात औषधे आणि खतांचा खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साठल्याने कांद्याची रोपे सडून नष्ट झाली आहेत. एक महिन्यांपूर्वी पावसाअभावी फुकट मिळणाऱ्या कांद्याच्या रोपांचे तसेच बियाणांचे आता बाजार वाढण्याची शक्यता आहे.

विनायक चतुर्थी निमित्त श्री महागणपती ला १२१ डझन केळींचा महानैवेद्य

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात गेल्या ८ दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पाऊसामुळे काढणीस आलेला कांदा आणि लागवडीस आलेली कांद्याची रोपे सडण्याच्या मार्गावर असुन शिंदोडी, निमोणे, गुनाट, चिंचणी, मोटेवाडी, करडे, चव्हाणवाडी, आंबळे परीसरात शेतात पाणी साठल्याने शेतकरी धास्तावला असुन परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची चिन्ह दिसत आहेत.

खैरेनगर मध्ये शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप

शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कांदा बियाणे स्वस्त होते. खरीप हंगामात पावसाने ताण दिल्याने अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी कांद्याची लागवड करता आली नाही. परंतु सध्या रब्बीच्या सुरवातीलाच परतीच्या पावसाने दमदार सुरवात केली असुन सगळीकडे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने रब्बी हंगामात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे.

संदीप फडके, कांदा उत्पादक शेतकरी   

पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG-PNG महागले...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Shirur talukyat sattachya pavasamule kandyachya roppana burs