शिरुर तालुक्यातील भाजपाचा पदाधिकारी लाच घेतल्याप्रकरणी अटक

देवेंद्र फडणवीस व शिवाजी भुजबळांच्या फोटोने तालुक्यात खळबळ

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य असलेले शिवाजीराव भुजबळ यांसह तिघांना शिरुर तालुक्यात असलेल्या त्यांच्या एका शिक्षण संस्थेतील शिपायाला नोकरीवरुन काढून न टाकण्यासाठी तसेच भविष्यातील पेंशन मिळवून देण्यासाठी अडीच लाख रुपये लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

शिक्रापूर: भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य असलेले शिवाजीराव भुजबळ यांसह तिघांना शिरुर तालुक्यात असलेल्या त्यांच्या एका शिक्षण संस्थेतील शिपायाला नोकरीवरुन काढून न टाकण्यासाठी तसेच भविष्यातील पेंशन मिळवून देण्यासाठी अडीच लाख रुपये लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून शिवाजीराव बाळासाहेब भुजबळ, मंगल शिवाजीराव भुजबळ व संदीप रंगनाथ गायकवाड असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहे. मात्र शिवाजीराव भुजबळ यांचा माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मिडीयावर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली असून भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा दसरा देखील पोलीस कोठडीत साजरा झाला आहे.

शिक्रापूरच्या कचरा प्रश्नाला राजकीय कुरखोड्यांचा वास

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य असलेले शिवाजीराव भुजबळ यांची शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय हि शिक्षण संस्था असून भुजबळ यांची पत्नी सदर संस्थेच्या अध्यक्ष पदावर आहे. सदर शिक्षण संस्थेमध्ये तक्रारदार युवकाचे वडील शिपाई पदावर नोकरीला असून ते नेहमी आजारी असल्याने त्यांना नोकरीवरुन काढून न टाकणेसाठी तसेच भविष्यात पेंशन योजना मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडे तीन लक्ष पन्नास हजार रुपयांची लाच मागण्यात आली.

शिरूर तालुक्यातील एकाला दुचाकी स्वाराच्या खून प्रकरणी अटक

दरम्यान त्यांच्यामध्ये चर्चा होऊन दोन लक्ष पन्नास हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत शिक्षण संस्थेत शिपाई असलेल्या व्यक्तीच्या युवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक, पोलीस निरीक्षक भारत साळुंके, पोलीस हवालदार नवनाथ वाळके, पोलीस शिपाई अंकुश आंबेकर, भूषण ठाकूर, चंद्रकांत कदम यांनी चंदननगर पुणे येथे तक्रारीची पडताळणी करत सापळा रचला असताना तक्रारदार यांच्याकडून अडीच लक्ष रुपयांची लाच स्विकारताना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

पिंपळे खालसात झाडाची बेकायदेशीरपणे कत्तल...

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव बाळासाहेब भुजबळ (वय ६२), समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयाच्या अध्यक्षा मंगल शिवाजीराव भुजबळ (वय ६२ )व समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयाचे लिपिक संदीप रंगनाथ गायकवाड (वय ४०) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक हे करत आहे.

शिरुर तालुक्यातील या गावातील विकास कामांच्या उदघाटनाला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी

देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोची चर्चा...
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव भुजबळ हे पक्षातील जेष्ठ नेते असल्याने त्यांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांची अनेकदा बैठक होत असते. त्याप्रमाणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा त्यांना फोटो काही ठिकाणी प्रसारीत झाला त्यामुळे सदर फोटोची मोठी चर्चा रंगली.

शिरुर तालुक्यातील अल्पवयीन युवती पोलिसांच्या तत्परतेने पालकांच्या स्वाधीन

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Shirur Talukyatil BJP office bearer Lach Ghetlyaprakarni Att