Video: शिरुर तालुक्यातील एका बँकेवर भरदिवसा दरोडा

२ कोटी ३१ लाख रुपयांची चोरी

पिंपरखेड (ता. शिरुर) येथे अचानक १:३० वाजेच्या दरम्यान पांढऱ्या कलरच्या सियाज कारमधून आलेले पाच जण गाडीतुन उतरुन बॅंकेत शिरले होते. त्यांन पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेवर भरदिवसा दरोडा टाकला आहे. या दरोड्यात २ कोटी ३१ लाख रुपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी लांबवली आहे.

सविंदणे: पिंपरखेड (ता. शिरुर) येथे अचानक १:३० वाजेच्या दरम्यान पांढऱ्या कलरच्या सियाज कारमधून आलेले पाच जण गाडीतुन उतरुन बॅंकेत शिरले होते. त्यांन पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेवर भरदिवसा दरोडा टाकला आहे. या दरोड्यात २ कोटी ३१ लाख रुपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी लांबवली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा असून येथे व्यवस्थापक मोहित चव्हाण रोखपाल सागर पानमंद व इतर २ कर्मचारी बँकेमध्ये कामकाज करीत होते. त्यावेळी येथे दहा-बारा शेतकरी ग्राहकदेखील उपस्थित होते.

पारनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू

अचानक १: ३० वाजेच्या दरम्यान पांढऱ्या कलरच्या सियाज कारमधून आलेले ५ जण गाडीतुन उतरुन बॅंकेत शिरले. १ जण दरवाजामध्ये थांबला तर चौघे आत केबिनमधे शिरले. त्यांनी मॅनेजर व रोखपाल यांना पिस्तुलचा धाक दाखवीत जीवे मारण्याची धमकी देत लॉकरच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर तेथील सुमारे २ कोटी रुपयांचे सोने व ३१ लाख रुपये रोख असा २ कोटी ३१ लाख रुपयांचा ऐवज चोरांनी घेऊन कार गाडीमधून पलायन केले. या गाडीवर प्रेसचा मोठा बोर्ड लावण्यात आलेला होता.

शिक्रापूरमध्ये जुन्या वादातून युवकांना मारहाण...

पिंपरखेडपासून शिरुर पोलिस स्टेशन सुमारे ४५ किमी अंतरावर आहे. घटना समजताच पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत  कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, सहाय्यक फौजदार नाजीम पठाण  घटनास्थळी हजर झाले. पुणे व नगर जिल्ह्यांची नाकाबंदी करण्यांची सुचना देण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. मात्र या परीसरात दिवसा प्रथमच दरोडा पडला असून या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात अनेक वित्तीय संस्था व बँका कार्यरत असून त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शेत काय तुझ्या बापाचे आहे का? म्हणून महिलेला मारहाण

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Shirur Talukyatil Eka Bankevar Bharadivasa Daroda