शिरुर तालुक्यातील मोटेवाडी तलाव भरला १०० टक्के

मोटेवाडी (ता. शिरुर) परीसरातील शेतकऱ्यांनी आमदार अ‍ॅड अशोक पवार यांची भेट घेत या तलावात पाणी सोडण्याची विनंती केली. त्यानंतर आमदारांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याने या तलावात ऑगस्ट महिन्यात पाणी सोडण्यात येऊन पाझर तलाव १०० टक्के भरुन घेण्यात आला.

शिंदोडी: शिरुर तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरवातीलाच पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवत होती. यावेळी मोटेवाडी (ता. शिरुर) परीसरातील शेतकऱ्यांनी आमदार अ‍ॅड अशोक पवार यांची भेट घेत या तलावात पाणी सोडण्याची विनंती केली. त्यानंतर आमदारांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याने या तलावात ऑगस्ट महिन्यात पाणी सोडण्यात येऊन पाझर तलाव १०० टक्के भरुन घेण्यात आला. त्यानंतर पाऊस नसल्याने या तलावातील पाण्याची पातळी थोड्या प्रमाणात घटली होती. परंतु सलग ४ ते ५ दिवस मुसळधार पाऊस झाल्याने तलावाच्या सांडव्यातुन पाणी वाहू लागले आहे.

खैरेनगर मध्ये शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप

शिरुर तालुक्याच्या पूर्वभागात सलग ३ ते ४ दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मोटेवाडी, चव्हाणवाडी या गावातील शेतीला वरदान ठरलेला ३६ दशलक्ष घनफुट पाणीसाठवण क्षमता असलेला मोटेवाडी (ता.शिरुर) येथील पाझर तलाव तुडुंब भरला असुन त्याच्या सांडव्याद्वारे पाणी वाहू लागले असल्याने येथील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असुन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याची माहीती चासकमानचे शाखा अभियंता राजेंद्र गोरे यांनी दिली.

पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG-PNG महागले...

शिरुर तालुक्यातील सगळे पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरुन घेण्याच्या चासकमानच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या असुन तालुक्यातील सर्व छोटे मोठे पाझर तलाव सध्या १०० टक्के भरले आहेत. सध्या शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने सध्यातरी पाणी प्रश्न मिटला असला तरीही शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय टाळून ठिबक सिंचन, तुषार सिंचन या पद्धतीचा वापर करुन पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे.
आमदार अ‍ॅड अशोक पवार

शिरुर तालुक्यात सततच्या पावसामुळे कांद्याच्या रोपांना बुरशीचा प्रादुर्भाव

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Shirur Talukyatil Motewadi Talav Bharla 100 tkka