शिरुर तालुक्यातील सरपंचांनी डीजेच्या तालावर धरला ठेका

शालेय शिक्षण समितीच्या निवडीनंतर गावात डीजेच्या गाण्यावर जल्लोष

शिंदोडी गावात १५ दिवसांपुर्वी करोनाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असुन सध्या गावात करोनाचे २ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे गावपुढाऱ्यांनी गावात सामाजिक सलोखा कसा राहील कोरोनाला प्रतिबंध कसा करता येईल यावर उपाययोजना करायला पाहीजे. परंतु हे सगळं करण्याऐवजी गावचे सरपंच अरुण खेडकर यांनीच गर्दी जमवत डीजे तालावर ठेका धरल्याने "शालेय शिक्षण समितीची वरात ग्रामपंचायतच्या दारात" असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

शिंदोडी: निवडणूक मग ती कोणतीही असो त्यात हवसे, नवसे, गवसे असतातच. शिरुर तालुक्यातील अनेक गावात सध्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडणुका पार पडत आहेत. परंतु या निवडणुकीत सध्या प्रत्येक गावात चुरस निर्माण होत असुन राजकीय पदाधिकारी स्वतःच्या मोठेपणासाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनवत आहेत. शिंदोडी (ता. शिरुर) येथे सोमवार (दि २५) रोजी शालेय शिक्षण समितीच्या ११ सदस्यांची निवड पार पडली. त्यानंतर सायंकाळी निवड झालेल्या काही सदस्यांची गावातुन डी जे च्या तालावर मिरवणुक काढण्यात आली. विशेष म्हणजे या डी जे तालावर गावचे सरपंचसुद्धा थिरकले. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाले असुन पोलीस आता 'त्या' सरपंचावर कारवाई करणार का...? हे बघणे औसुक्याचे ठरणार आहे.

शिरुर तालुक्यातील पूर्व भागात शेतकरी कांदे लागवडीत व्यस्त तर...

रांजणगाव गणपतीत दारुच्या नशेत पत्नीला चाकूने मारहाण

सोमवारी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीच्या वेळेस गर्दी होऊ नये म्हणुन ग्रामस्थांनी शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना दोन पोलीस कर्मचारी पाठवावेत अशी मागणी केली होती. पोलीस कर्मचारी आल्याने निवडणुक प्रकिया शांततेत पार पडली. परंतु रात्री काही उत्साही कार्यकर्त्यांनी डी जे च्या तालावर थिरकत निवडून आलेल्या सदस्यांची मिरवणूक काढली. यात सोशल डिस्टन्सचा पुर्णपणे फज्जा उडाला. तसेच गावाच्या सरपंचासह काही सदस्यांनीही डि जे च्या तालावर ठेका धरला.

शिरुर तालुक्यातील खंडणी मागितल्याप्रकरणी युवक अटक

गावात कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी ग्राम दक्षता समितीची स्थापना केलेली आहे. त्या समितीचे अध्यक्ष गावाचे सरपंच आणि सचिव गावचे तलाठी असतात. त्यांनीच गावातील सर्व गैरप्रकारावर लक्ष ठेवायचे असते. ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष जर डि जे च्या तालावर थिरकत असतील तर तक्रार कोण करणार....? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. याबाबत ग्राम दक्षता कमिटीचे सचिव तलाठी विजय बेंडभर यांच्याकडे विचारणा केली असता. या प्रकाराबाबत मला काहीच माहीत नसुन सदर प्रकाराबाबत शिंदोडीच्या सरपंचाशी बोलणार असल्याचे त्यांनी "शिरुर तालुका डॉट कॉम" शी बोलताना सांगितले. तसेच गावचे ग्रामसेवक विकी पोळ यांनाही या मिरवणुकीबाबत विचारले असता. मला याबाबत काहीच माहित नसल्याचे त्यांनी सांगितले.

बुरुंजवाडीच्या सरपंच पदी नानासाहेब रुके बिनविरोध

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur talukyatil sarpanchani djchya talawar dharla contract