शिरुर तालुक्यातील विद्यार्थी कोरोनातून सुटले अन...

ST च्या संपामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचण

ग्रामीण (Rural) भागातील शाळा (School) दिवाळीनंतर अनेक आचके देत पुन्हा सुरु झाल्या खऱ्या मात्र पण ST च्या संपामुळे दुरवरुन येणाऱ्या विद्यार्थ्यां (students) समोर पुन्हा अडचणी निर्माण झाल्या असून विद्यार्थी (students)कोरोनातून (Corona) सुटले अन ST च्या अडचणीमध्ये अडकले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

शिक्रापूर: ग्रामीण (Rural) भागातील शाळा (School) दिवाळीनंतर अनेक आचके देत पुन्हा सुरु झाल्या खऱ्या मात्र पण ST च्या संपामुळे दुरवरुन येणाऱ्या विद्यार्थ्यां (students) समोर पुन्हा अडचणी निर्माण झाल्या असून विद्यार्थी (students)कोरोनातून (Corona) सुटले अन ST च्या अडचणीमध्ये अडकले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

तळेगाव ढमढेरेत घरा शेजारील झाड तोडल्याने दोन गटात हाणामारी...

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील जवळपास अडीचशे मुले मुली दररोज ST ने प्रवास करुन शाळेत येत असतात, परिसरातील दुर्गम भागातील मलठण, लाखेवाडी, शास्ताबाद, मोराची चिंचोली, खैरेनगर यांसह आदी ठिकाणावरुन येणाऱ्या मुलांसमोर कोरोना नंतर शाळा सुरु झालेल्या असताना ST च्या संपामुळे असंख्य अडचणी निर्माण झाल्या आहेत.

School: शिरुर तालुक्यातील देशात गाजलेल्या आंतरराष्ट्रीय शाळेचा अखेर पदार्फाश

सध्या पेट्रोलचे दर आकाशात भिडल्याने पालक मुलांना दुचाकी देण्यास तसेच मुलांना शाळेत सोडण्यासाठी येण्यास  तयार नाहीत. दीपावलीच्या अगोदर शाळांच्या परीक्षा झाल्या असून आता वर्गात शिक्षक उत्तरपत्रिका तपासून देत आहेत. अशावेळी शाळेत न आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्याला किती गुण मिळाले हे समजत नाही. मात्र दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकसभा घेणे गरजेचे असल्याने शिक्षकांना त्यांचे काम करणे गरजेचे आहे. मात्र मुलांना उत्तरपत्रिका देताना मुलांची अनुपस्थिती शिक्षकांना जाणवत आहे.

Shikrapur Police: शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची कारवाईस टाळाटाळ...?

विद्यार्थ्यांना शाळेत यायचे म्हटले तर चक्क उन्हातून एक तास पायी प्रवास करावा लागत आहे. मात्र शाळेच्या महत्वाच्या काळात विद्यार्थी शाळेत गैरहजर राहिले तर त्यांचे शैक्षणिक नुकसान कसे भरुन काढायचे असा प्रश्न पालक व शिक्षकांना भेडसावत आहे. तर शाळेमध्ये शिक्षण घेत असताना वाहन नसल्याने घरापासून पायी शाळेत यावे लागत असल्याने विद्यार्थी थकून जात आहेत त्यामुळे शाळेत अभ्यासाकडे लक्ष लागत नाही. तसेच शाळेतून घरी पायी थकत जावे लागत असल्याने घरी अभ्यास होत नाही विद्यार्थिनींना घरातील कामांना वेळ देता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन इकडे आड, तिकडे विहीर असे झाले असून कोरोना तून सुटका करुन घेताच विद्यार्थी ST च्या अडचणीमध्ये अडकले असल्याचे दिसून येत आहे.  

Death: जुन्नर तालुक्यात पतसंस्थेत गोळीबार व्यवस्थापकाचा मृत्यू

बारावीचे वर्ष असून संप लवकर मिटावा; ऋतुजा बारकू शिंदे
मलठण येथील शिंदेवाडी येथून रोज कान्हूरच्या विद्याधाम विद्यालयात येत असताना शिंदेवाडी ते मलठण आणि मलठणवरून कान्हूर मेसाई असा प्रवास मी एसटी बसने करते. मात्र आता एसटी चा संप असल्याने मला शाळेत जाणे अवघड झाले आहे. माझे बारावीचे महत्वाचे वर्ष असून हा संप लवकरच मिटवा अशी प्राथना करते असे ऋतुजा बारकू शिंदे या विद्यार्थिनीने सांगितले.

Reshning: रेशनबाबत केंद्र सरकारचा महत्त्वपुर्ण निर्णय

शासनाने या प्रश्नाकडे गंभीरपणे पहावे; अनिल शिंदे
मुलांना शिक्षण घेण्यासाठी मोठी पायपीठ करावी लागत असून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे परंतु शासनाने या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहणे तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळणे गरजेचे आहे असे मत विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी व्यक्त केले.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Shirur Talukyatil Vidyarthi Coronatoon Sutle An