शिरुरच्या तहसिलदारांवर टांगती तलवार...?

भ्रष्टाचाराची चौकशी करुन ३० दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन

शिरुरच्या तहसिलदारांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून तसेच शासनाचा अब्जावधी रुपयांचा महसूल बुडवून कारवाई केलेल्या वाळूच्या गाडया तहसीलदार यांच्या ताब्यात असताना रात्रीच्या वेळेस बाहेर काढून त्यातील वाळू खाली करत त्यात क्रश सॅण्ड भरुन पुन्हा गाड्या तहसील कार्यालयात लावण्यात आल्या.

शिरुर: शिरुरच्या तहसिलदारांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून तसेच शासनाचा अब्जावधी रुपयांचा  महसूल बुडवून कारवाई केलेल्या वाळूच्या गाडया  तहसीलदार यांच्या ताब्यात असताना रात्रीच्या वेळेस बाहेर काढून त्यातील वाळू खाली करत त्यात क्रश सॅण्ड भरुन पुन्हा गाड्या तहसील कार्यालयात लावण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाला फेर पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि त्या गाड्या सोडून देण्यात आल्या असे अनेक गंभीर प्रकार तहसिलदार यांनी केलेले आहेत. तसेच अनेक तलाठ्यांनी अवैध वाळूच्या गाड्यांचे पंचनामे, अवैध गौण खनिज उत्खननाचे पंचनामे  तहसीलदार कार्यालयाकडे जमा केलेले असताना अनेक पंचनामे जाणीवपूर्वक गहाळ करण्यात आलेले असुन याबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी  गौण खनिज दप्तर तपासणीकामी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली आहे.           

शिरुर तालुक्यात भाद्रपदी पोळा मोठ्या उत्साहात साजरा                             

वरीष्ठांना वारंवार लेखी तक्रार करुनही कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने पत्रव्यवहार करत  १ ऑक्टोबर रोजी आत्मदहन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे व त्यांचे सहकारी मंत्रायलासमोर  पोहचले होते. मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन मुंबई, शिक्रापूर पोलिस स्टेशन, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांचे अधिकारी व पथकातील कर्मचारी रात्रंदिवस अशोक भोरडे यांनी आत्मदहन करु नये म्हणून त्यांचा शोध घेत होते. परंतु अशोक भोरडे व त्यांचे सहकारी यांनी पोलिस प्रशासनाला हातावर तुरी देत मंत्रालयाच्या दारात पोहोचले पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख हे स्वतः या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून होते व ते स्वतः अशोक भोरडे यांच्याशी संपर्क साधत आत्मदहन करण्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते.

राजकारणात संवाद हवा वाद नको:- सुजाता पवार

तसेच पुण्याचे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख  हे सुद्धा भोरडे यांच्या संपर्कात होते. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन तसेच महसूल प्रशासनाच्या वतीने ३० दिवसाच्या आत आम्ही कारवाई करतो असे लेखी पत्र अशोक भोरडे यांना दिल्यानंतर अशोक बोराडे यांनी यांनी प्रशासनाला कारवाई करण्यासाठी ३० दिवसाची वाढीव मुदत दिली आहे. तसेच मंत्रालयातील महसूल उपसचिव यांनी पुणे येथील विभागीय आयुक्त (महसूल) यांना चौकशी करुन  ३० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्या बाबतच्या सूचना दिल्या आहेत. ३० दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास अशोक भोरडे यांनी शासनाला कुठलीही पूर्वकल्पना न देता मंत्रालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुख्य महसूल सचिव, पुणे विभागीय आयुक्त तसेच  पुण्याचे जिल्हाधिकारी यांनाही लेखी पत्र दिले आहे.

कान्हूर मेसाईच्या विद्यार्थ्यांनी घेतली वन्य जीवांची माहिती

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Shirurchaya Tehsildaranwar Hangati Sword