खासदार संजय राऊत पुण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे भाजपला आव्हान

शिवसैनिकांच्या आग्रहाखातर गणेशोत्सवासाठी खासदार संजय राऊत पुढील आठवड्यात पुण्यात येणार असून त्यांना कोणी अडविण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना स्टाईलने भाजपचे स्वागत केले जाईल, असा इशारा शहर शिवसेनेने दिला.

पुणे: शिवसैनिकांच्या आग्रहाखातर गणेशोत्सवासाठी खासदार संजय राऊत पुढील आठवड्यात पुण्यात येणार असून त्यांना कोणी अडविण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना स्टाईलने भाजपचे स्वागत केले जाईल, असा इशारा शहर शिवसेनेने दिला.

 

मोठी घोषणा! राज्यातील कॉलेजेस सुरू होण्याचा मुहूर्त ठरला!

 

खासदार राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शहर भाजपच्या वतीने पोलिसात तक्रार दिली असून खासदार राऊत यांनी या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी करत खासदार राऊत यांना पुण्यात फिरकू देणार नसल्याचा इशारा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला होता. त्याचा खरपूस समाचार शहर शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांनी घेतला. नगरसेवक विशाल धनावडे, बाळा ओसवार, नगरसेविका संगीता ठोसर, पल्लवी जावळे उपस्थित होत्या.

शिखर-आयेशा यांची फेसबुकवरुन झाली होती प्रेमाची सुरुवात

सुतार म्हणाले, खासदार संजय राऊत यांना शिवसैनिकांनी पुण्यात येण्याचे निमंत्रण दिले असून त्यांनी ते स्वीकारले आहे. त्यानुसार, गणेशोत्सवात ते पुण्यात येत आहेत. त्यांना कुणीही अडवूनच दाखवावे असा इशारा दिला, तर थरकुडे यांनी त्यांना अडचिण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांचे स्वागत शिवसेना स्टाईलने केले जाईल, अशा शब्दात टीका केली. मुळीक यांनी आधी शहराची हद्द समजून घ्यावी, स्वत:च्या पायावर उभे राहावे मग आम्हाला इशारा द्यावा अशी टीका नगरसेवक ओसवाल यांनी केली.

Video: महादेवाच्या मंदिरात झोपल्यावर पांघरुणात शिरला कोब्रा...

भाजपने ११ गावांत हेच केले का?
यावेळी शिवसेना शहराध्यक्ष मोरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नुकतीच २३ गावे आघाडी सरकारने जागा हडपण्यासाठीच घेतली असल्याची टीका केली होती. त्यावर, उत्तर देताना मोरे यांनी ११ गावांमध्ये भाजप आणि प्रदेशाध्यक्ष पाटील हेच उद्योग करत होते का असा सवाल उपस्थित केला आहे. ही गावे घेताना भाजपने काय काय केले हे सर्वांना माहीत असून आता आपल्याकडे काहीच राहिले नसल्याचे दिसताच, अशी टीका केली जात असल्याचे मोरे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Shiv Sena s challenge to BJP that MP Sanjay Raut will come t