धक्कादायक! २० दिवसांच्या कालावधीत कोरोनाने संपूर्ण कुटुंब केले उद्ध्वस्त...

एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू

कोरोनाच्या कचाट्यात सापडून २० दिवसांच्या कालावधीत एकाच कुटुंबातल्या ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ६ जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर एकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचाही मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

लखनौ: कोरोना महामारीच्या संकटाने देशात हाहाकार माजवला असुन कोरोनाने अनेकांना फारच वाईट दिवस दाखवले आहेत. कुटुंबातील कर्तीसवरती माणसे डोळ्या समोर निघून जात आहेत. तर माता-पिता, भाऊ-बहीण असे सामुदायिक मृत्यू होत असल्याने हसत्या-खेळत्या कुटुंबांवर स्मशानकळा येताना दिसून येत आहेत.

डॉक्टर हेच कोरोना काळातील खरे देवदूत; अशोक भुजबळ

May be an image of text

उत्तर प्रदेश मधल्या लखनौ जवळ असलेल्या इमलिया गावात अशीच हृदयाचे ठोके वाढविणारी घटना समोर आली आहे. कोरोनाच्या कचाट्यात सापडून २० दिवसांच्या कालावधीत एकाच कुटुंबातल्या ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ६ जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर एकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचाही मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Image

टकले सर म्हणजे गणित विषयाचे जादूगारच; प्राचार्य शिंदे

या घटनेनंतर प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला असुन एका गावात एवढे मृत्यू होत आहेत तर याबाबत चौकशी व्हायला हवी. मात्र, गावात साधी स्वच्छतेची सुविधाही उपलब्ध करुन दिलेली नाही, अशी माहिती गावचे प्रमुख मेवाराम यांनी दिली आहे. तसेच मृत व्यक्तींना योग्य उपचार मिळाले नाहीत, त्यांना ऑक्सिजनयुक्त बेड्स मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आला आहे. या गावात ५९ कोरोना रुग्ण मिळाले. मात्र त्यांना प्रशासनाकडून कोणतीच उपचार पद्धती देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना स्वत:च त्यांची काळजी घ्यावी लागत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Shocking In a period of 20 days Corona destroyed the whole
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे