Video: महादेवाच्या मंदिरात झोपल्यावर पांघरुणात शिरला कोब्रा...

महादेवाच्या मंदिरात झोपणारा हा तरुण रोजच्याप्रमाणे अंगावर चादर घेऊन फरशीवर झोपला होता. मध्यरात्रीच्या सुमाराला एक कोब्रा त्याच्या चादरीत शिरला.

जयपूर (राजस्थान): महादेवाच्या मंदिरात झोपलेल्या तरुणाच्या पांघरुणात कोब्रा नाग शिरल्यानंतर हा तरुण थोडक्यात बचावल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Shocking Video: नाकात साप घालून काढला तोंडातून बाहेर...

महादेवाच्या मंदिरात झोपणारा हा तरुण रोजच्याप्रमाणे अंगावर चादर घेऊन फरशीवर झोपला होता. मध्यरात्रीच्या सुमाराला एक कोब्रा त्याच्या चादरीत शिरला. सुरुवातीला त्याला काहीच कळले नाही, मात्र ज्यावेळी त्याला नाग शिरल्याची जाणीव झाली तेव्हा झटका बसल्याप्रमाणे तो तिथून दूर झाला. या भागात बिबट्यांची आणि कोब्रा नागांची मोठी दहशत आहे. कुठलाही प्राणी हल्ला करण्याची शक्यता असते. मात्र भगवान शंकरावर असणाऱ्या गाढ विश्वासाच्या जोरावर हा तरुण मंदिराच्या परिसरातच चादर घेऊन झोपत असे.

नेहमीप्रमाणे हा तरुण गाढ झोपेत असताना एक कोब्रा त्याच्या पांघरूणात शिरला. झोपेत असणाऱ्या तरुणाला सुरुवातीला बेडूक पांघरूणात शिरल्यासारखे वाटले. त्यामुळे पायाने त्याने बेडकाला दूर झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पांघरुणात शिरलेला प्राणी हा बेडूक नसून दुसरा कुठला तरी असल्याची त्याची खात्री पटली. झोपेतून चादर झटकून तो ताडकन उभा राहिला आणि काही पावले दूरवर गेला. त्याचवेळी कोब्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुण काही अंतरावर उभा असल्याने या हल्ल्यातून बचावला. त्यानंतर मात्र कोब्रादेखील घाबरला आणि तिथून निघून गेला. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडत आहे.

बापरे! 'सनी देओल'ने खाल्ला नागाचा फणा...

युवकाच्या पॅंटीमध्ये रात्री शिरला कोब्रा अन्...

Video: नागाने कोंबडीसह खाल्ली पाच अंडी

Video: तुला कापू का विचारल्यावर कोंबडी म्हणाली नको...

Video: बापरे! दारूच्या नशेत युवक भिडला नागाला अन्...

Video: महिला कार चालवत असताना नागाने काढला फणा

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: snake attacks sleeping youth video goes viral at rajasthan