सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांमुळे महावितरण विभागाला मिळाली नूतन वास्तू

खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन

खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांमुळे भाड्याच्या जागेत सुरु असलेल्या विभागीय कार्यालयाला हक्काची जागा मिळाली असून, परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली महावितरणचे सर्व अधिकारी उपलब्ध झाले आहेत.

बारामती: दौंड तालुक्यातील महावितरणच्या केडगाव (दापोडी) येथील विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन (दि. ५) खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते झाले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांमुळे भाड्याच्या जागेत सुरु असलेल्या विभागीय कार्यालयाला हक्काची जागा मिळाली असून, परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली महावितरणचे सर्व अधिकारी उपलब्ध झाले आहेत.

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर अपघातात चिमुकलीसह आई-वडिलांचा मृत्यू... 

दौंड व शिरुर तालुक्यातील वीज ग्राहकांसाठी केडगाव (दापोडी) येथे महावितरणचे विभागीय कार्यालय आहे. विभागीय कार्यालयाच्या निर्मितीपासूनच ही वास्तू भाड्याच्या जागेत होती. त्यासाठी दरमहा ६० हजार प्रमाणे वर्षाला ७ लाख २० हजार भाडे महावितरणला द्यावे लागत होते. तर उपविभागीय कार्यालय दुसऱ्या ठिकाणी असल्यामुळे ग्राहकांना दोन ठिकाणी जावे लागे. परंतु खा. सुप्रियाताई सुळे यांनी त्यांच्या प्रयत्नांमुळे या कार्यालयाला तब्बल दीड कोटी रुपयांची देखणी अशी वास्तू मिळाली आहे. परिणामी ग्राहकांची व कर्मचाऱ्यांची सोय झाली आहे.

'त्या' पीडित कुटुंबाला राजेंद्र जगदाळे पाटील यांनी दिला मदतीचा हात!

मंगळवारी (दि. ५) या नूतन वास्तूचे उद्घाटन खा. सुळे यांच्या हस्ते झाले यावेळी पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन रमेश थोरात, जिप समाज कल्याण सभापती  सारिका पानसरे, माजी आमदार पोपटराव गावडे, जि.प सदस्या राणी शेळके, विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य प्रवीण शिंदे यांचेसह महावितरणचे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, मुख्य अभियंता सुनील पावडे, स्थापत्य मुख्य अभियंता वादिराज जहागीरदार, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील व भाऊसाहेब इवरे आदींची उपस्थिती होती.

शिरुर रिपाइं कामगार आघाडीचा तालुकाध्यक्ष स्थानबद्ध

यावेळी मार्गदर्शन करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘(दि. ४) रोजी काही तासांसाठी व्हॉट्सअप नव्हते तर सर्व माध्यंमावर त्याची ब्रेकिंग न्यूज होती. तंत्रज्ञानामुळे नागरिकांचे प्राधान्यक्रम बदलले असले तरी विजेचे महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना काळात वीज कर्मचाऱ्यांनी २४ तास काम करुन कोरोनाच्या लढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे’. त्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे टाळ्या वाजवून जाहीर अभिनंदन केले.

May be an image of 10 people, people standing and text that says 'कारेगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी संदिप विश्वासराव नवले पाटील यांची निवड झाल्याबद्दल हा्िकिनेद शुभेच्छुक शुभमभैय्या नवले आणि मित्र परिवार'

प्रास्ताविक भाषणात मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी महावितरणच्या कृषी योजनेची सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांना वीज‍बील भरण्याचे आवाहन केले. तर प्रादेशिक संचालक नाळे यांनी शेतकऱ्यांनी वीजबिल भरले तर त्यातील कृषी आकस्मिक निधीचा वापर पायाभूत यंत्रणेसाठी करण्यात वसुलीचे महत्व पटवून दिले. शेवटी आभार कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी केले. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील वीजग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

big boss च्या घरामध्ये रंगणार माझे मडके भरी टास्क

पिंपळे जगताप मध्ये किरकोळ कारणावरुन दोन गटात हाणामारी

Title: Supriya Sule Yanchya Prayatanmule Mahavitaran Vibhagala Mila