Head Master: निलंबन झाल्यानंतर देखील वाबळेवाडी करांना वारेंची ओढ

चक्क लोकप्रतिनिधींवर आरोप करत निलंबन रद्दची मागणी

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील देशात गाजलेल्या आंतरराष्ट्रीय (international) वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेतील (School) मुख्याध्यापक (head master) राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक (Teacher) दत्तात्रय वारे (Dattatray Ware) यांना जिल्हा परिषदेकडून दोषी ठरवत निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आल्याने बुधवार (दि. २४) रोजी पुन्हा वाबळेवाडीच्या ग्रामस्थांनी शाळेत बैठक घेत शिक्षकांचे निलंबन (suspension) रद्द करण्याची मागणी केली आहे.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील देशात गाजलेल्या आंतरराष्ट्रीय (international) वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेतील (School) मुख्याध्यापक (head master) राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक (Teacher) दत्तात्रय वारे (Dattatray Ware) यांना जिल्हा परिषदेकडून दोषी ठरवत निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आल्याने बुधवार (दि. २४) रोजी पुन्हा वाबळेवाडीच्या ग्रामस्थांनी शाळेत बैठक घेत शिक्षकांचे निलंबन (suspension) रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अद्याप देखील दोषी शिक्षकाची वाबळेवाडीकरांना ओढ असल्याचे दिसून येत आहे.

Shirur: शिरुरच्या शिक्षकांकडून आदिवासी विद्यार्थ्यांना मिळाली मायेची ऊब

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आंतरराष्ट्रीय वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेतील घडामोडी नंतर सदर शाळेचे मुख्याध्यापक असलेले राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक दत्तात्रय वारे यांना जिल्हा परिषदेने पदाचा दुरुपयोग, कामकाजात हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर करणे, प्रशासकीय कामकाजात निष्काळजीपणा करणे यांसह आदी ठपके ठेवत निलंबित करत त्यांची पुढील चौकशी सुरु केलेली आहे, मात्र बुधवार (दि. २४) रोजी येथील स्थानिकांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पालकांना शाळेत बोलावीत बैठक घेतली असताना चक्क सेवानिवृत्त केंद्रप्रमुख वंदना मोरे यांसह आदींनी हजेरी लावत लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा परिषद सदस्यांवर आरोप करत केलेले निलंबन हे सूडबुद्धीने केल्याचा आरोप केला आहे, मात्र शाळेमध्ये देण्यात आलेल्या देणग्या पालकांनी स्वइच्छेने दिले असल्याचे जाहीर केले, तर यावेळी यापूर्वी शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी चक्क तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, वळसे पाटील यांसह आदींनी फोन करुन प्रवेश देण्यासाठी आग्रह केला असल्याचे देखील आरोप लोकप्रतिनिधींवर करण्यात आले आहे.

तळेगाव ढमढेरेत घरा शेजारील झाड तोडल्याने दोन गटात हाणामारी...

दरम्यान राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक दत्तात्रय वारे यांचे झालेले निलंबन रद्द करावेत अन्यथा शाळेवर बहिष्कार टाकू, मुलांना शाळेत पाठवणार नाही तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जो पर्यंत शाळेत येत नाही तो पर्यंत शाळेमध्ये कोणाला प्रवेश देणार नसल्याचे देखील येथील ग्रामस्थांनी जाहीर करत निलंबनाचा निषेध व्यक्त केला आहे.

'त्या' विमा कंपन्यांवर अजित पवार संतापले म्हणाले...

जमीन खरेदीखत २०२० वंदना मोरेंनी सांगितले २००२
वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे राष्ट्रपती पुरस्कार विजेते मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी २०२० मध्ये जमीन घेतलेली असून त्याचे खरेदीखत समोर असताना देखील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख वंदना मोरे यांनी यावेळी सहानुभूती मिळविण्यासाठी वारे गुरुजींनी खरेदी केलेली जमीन २००२ मध्ये घेतली असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

Reshning: रेशनबाबत केंद्र सरकारचा महत्त्वपुर्ण निर्णय

दोषी ठरविणारे अधिकारी यापूर्वी झोपले होते का?
वाबळेवाडी शाळेसाठी इतक्या दिवस कधीही लक्ष न देता शाळेमध्ये कधीही न येणारे जिल्हा परिषद शाळेमध्ये आता लक्ष देत आहेत, केवळ राजकारणापोटी शाळेबाबत कार्यवाही केली जात आहे मात्र शाळेला दोषी ठरविणारे अधिकारी यापूर्वी झोपले होते का असा देखील सवाल यापूर्वी स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Suspension Jhalyanantar Dekhil Wabalewadi Karana Warenchi Od