वढू बुद्रुक मध्ये स्कोर्पिओ मधून टॅब लंपास...

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे एका स्कोर्पिओच्या खिडकीतून एका अज्ञात व्यक्तीने टॅब चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे एका स्कोर्पिओच्या खिडकीतून एका अज्ञात व्यक्तीने टॅब चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिवसेना सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविणार; ज्ञानेश्वर कटके

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील के ई एम हॉस्पिटलमध्ये नोकरीला असलेले विवेक पाखरे हे त्यांच्या ऑफिसच्या एम एच १२ जे सि ९४९४ या स्कोर्पिओ कार मधून आलेले असताना त्यांनी त्यांच्या जवळील टॅब सदर स्कोर्पिओ मध्ये ठेवलेला होता. स्कोर्पिओ चालक दिपक भंडारे यांच्या घरी जेवणाचा डबा घ्यायला जाऊन डबा घेऊन पुन्हा ते स्कोर्पिओ मध्ये येवून बसले असताना त्यांना कारमध्ये ठेवलेला टॅब दिसून आला नाही.

शिरुर तालुक्यातील नावारुपाला आलेल्या आंतरराष्ट्रीय शाळेतून होतेय पालकांची लुट

May be an image of text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Ant of Speech सूत्रसंचालन संभाषणचातुर्य देहबोली सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास नविन बॅचसाठी प्रवेश सुरु भाषणशास्र लिडरशीप डेव्हलपमेंट गंगाविहार, नगर-पुणे रोड, षटकार कॉलनी, शिरूर, ,जि.पुणे मो.नं. 9860927799 9615927799 ई-मेल: chakrer@gmail.com f भाषण करायला शिका. या पेजवर भेट द्या.'

युवकांनी व्यवसायात सचोटी ठेवावी; शिवाजीराव आढळराव

त्यामुळे त्यांनी इतरत्र तसेच चालक दिपक भंडारे याच्या घरी टॅबचा शोध घेतला असता त्यांना तो मिळून आला नाही. त्यामुळे आपला टॅब कोणीतरी चोरुन नेल्याची खात्री झाल्याने याबाबत विवेक रामराव पाखरे (वय २७) रा. पिंपळे गुरव रोड कासारवाडी पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर हे करत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Tab Lampas from Scorpio in Vadu Budruk