तानाजी धरणे यांचे 'शेताच्या बांधावर' व 'सांजवेळ' काव्य संग्रह प्रकाशित

तानाजी बबन धरणे यांना शालेय जीवनापासून कविता करण्याचा छंद आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना तो वृद्धिंगत झाला.

महाड (रायगड): शिरूर तालुक्यातील आंबळे (अनोसेवाडी) येथील सुपुत्र तानाजी बबन धरणे यांनी लिहिलेल्या शेताच्या बांधावर व सांजवेळ या काव्य संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

तानाजी धरणे यांना साहित्यरत्न पुरस्कार

श्री. धरणे यांचा सांजवेळ हा तिसरा काव्य संग्रह आहे. 'शेताच्या बांधावर' व 'स्वप्नचिञ' ही प्रकाशित झाले असून, त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार मिळाला आहे. सन २०२१ या वर्षीचा मनुष्यबळ विकास अकादमी मुंबई यांचा राज्यस्तरीय 'साहित्यरत्न' हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने "अखिल भारतीय मराठी साहित्य समूह महाड व मुंबई तसेत पुणेरी आवाज Fm 107.8  या केंद्रावर Rj कैलास यांच्या मधूर आवाजात "आरोग्य धनसंपदा" ही कविता प्रसारित झाली आहे. शिवाय, विविध 50हून अधिक प्रमाणपत्रे मिळाली आहेत. 

श्री. तानाजी धरणे यांच्या कविता...

मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनेक कवींनी मराठी भाषेच्या साहित्यात मोलाची भर टाकली आहे. ही परंपरा अखंडीत सुरू राहावी, यासाठी नवोदित कवी आपल्या काव्यातून निसर्ग, शेती, प्रेमभावना, विरह, श्रृंगाराचे भाव रेखाटतात. नोकरी सांभाळत साहित्य व काव्य हा त्यांचा आवडता विषय असल्याने वेळ मिळेल तेंव्हा कविता शब्दबध्द करण्याच्या छंदातून उत्तम काव्य निर्मिती झाली. त्यांच्या कवितांचा चाहता वर्गही मोठा आहे.

शालेय जीवनापासून छंद...
धरणे यांना शालेय जीवनापासून कविता करण्याचा छंद आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना तो वृद्धिंगत झाला. कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून ते रायगड जिल्हा परिषदेत पेणमधील पाबळ ग्रामपंचायतीवर ग्रामसेवक पदावर काम करत आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: tanaji dharne shetachya bandhawar and sanjwel publish mahad
प्रतिक्रिया (1)
 
संतोष जाधव-पेण
Posted on 28 July, 2021

धरणे साहेब तुमच्या कविता अप्रतिम आहेत.तुमच्या कविता मनाला भिडणाऱ्या आहेत.अशाच कवितांचे लेखन आपल्या हातून घडत राहो.तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा !