तहसीलदार लैला शेख यांचे भय अधिकाऱ्यांना नाही का ?

कोरेगाव भीमा मधील नियम तोडणाऱ्यांवर गुन्हे कोण दाखल करणार

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयात एक कार्यक्रम केला. मात्र यावेळी सर्वांना कोरोनाच्या नियमांचा विसर पडला असल्याचे दिसून आले.

शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयात एक कार्यक्रम केला. मात्र यावेळी सर्वांना कोरोनाच्या नियमांचा विसर पडला असल्याचे दिसून आले. परंतु यापूर्वी नियम तोडणाऱ्यांवर शिरुर च्या तहसीलदार लैला शेख यांनी गुन्हे दाखल करण्याचे लेखी आदेश देऊन देखील संबंधित विभागाचे प्रतिनिधी गुन्हे दाखल करत नाही. त्यामुळे तहसीलदार लैला शेख यांचे भय अधिकाऱ्यांना नाही.

शिरुर तालुक्यातील संयुक्त पथकांद्वारे होणार कंपन्यांची तपासणी

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे २ आठवड्यांपूर्वी एका सर्वसामान्य युवकाने नवीन कार खरेदी केल्यानंतर त्याने घरासमोर कारचे पूजन केले. यावेळी ८ ते १० नागरिकांनी एकत्र फोटो काढला असताना तो फोटो प्रसारित झाल्यानंतर शिरुरच्या तहसीलदार लैला शेख यांनी त्या फोटो बाबत गुन्हे दाखल करत करवाई करण्याचे आदेश दिले असल्यामुळे कोरेगाव भीमाचे तलाठी जयमंगल धुरंदर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले होते. मात्र सध्या कोरेगाव भिमा येथील एका कार्यक्रमात अनेक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत गर्दी करुन कार्यक्रम साजरा केला.

कोरोनाच्या नियमांची राजकीय नेत्यांकडूनच पायमल्ली

दरम्यान पंधरा पदाधिकाऱ्यांनी एकत्रित गर्दी करुन फोटो देखील काढला. मात्र चक्क ९ जणांनी मास्क चा वापरच टाळला. त्यामुळे कोरेगाव भिमा मधील पदाधिकाऱ्यांना कोरोणाचे गांभीर्य आहे की नाही, असा प्रश्न पडू लागला आहे. कोरेगाव भीमा मधील नागरिकांना नियम मोडून देखील अभय मिळत असल्याने शिरुर तालुक्यातील अनेक ठिकाणी अशा प्रकारे नियम पायदळी तुडविले जात आहेत. शिरुर च्या तहसीलदार लैला शेख यांनी एका शासकीय विभागास कोरेगाव भीमा येथील सदर व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे लेखी आदेश दिलेले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असून कोरेगाव भिमा येथील कार्यक्रमात तसेच सदर नियम तोडलेल्या फोटोत एक शासकीय व्यक्ती तसेच एका ज्येष्ठ राजकीय व्यक्तीच्या घरातील व्यक्ती असल्याने या घटनेबाबत गुन्हे दाखल केले जात नसल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Tehsildar Laila Sheikh is not feared by the authorities
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे