युवकांनी व्यवसायात सचोटी ठेवावी; शिवाजीराव आढळराव

माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची वाजे वडेवाले शाखेला भेट

युवकांनी व्यवसायात सचोटी ठेवत प्रामाणिकपणा ठेवत जिद्दीने कोणताही व्यवसाय केल्यास युवक आपल्या कर्तुत्वाने नक्कीच मोठे उद्योगपती होऊन इतरांना प्रेरणा देऊ शकतात असे प्रतिपादन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे.

शिक्रापूर: युवकांनी व्यवसायात सचोटी ठेवत प्रामाणिकपणा ठेवत जिद्दीने कोणताही व्यवसाय केल्यास युवक आपल्या कर्तुत्वाने नक्कीच मोठे उद्योगपती होऊन इतरांना प्रेरणा देऊ शकतात असे प्रतिपादन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे.

मोठी बातमी! आधी दोन बडे मंत्री पवारांना भेटले अन्...

वाजेवाडी (ता. शिरुर) येथील युवा उद्योजक दादा वाजे या युवकाने स्वतःच्या कर्तुत्वावर उभारलेला हॉटेल व्यवसाय तसेच सदर व्यवसायातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करुन देत व्यवसायाच्या केलेल्या अनेक शाखा याबाबत माहिती मिळाली असल्याने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकतीच वाजे वडेवाले यांच्या शिक्रापूर चाकण रस्त्यावरील मुख्य शाखेला भेट दिली. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद, रवींद्र करंजखिले, जातेगावचे माजी सरपंच समाधान डोके, शिरुर आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे शिवसेना उपतालुकाप्रमुख नितीन दरेकर, युवा उद्योजक दादा वाजे यांसह आदी उपस्थित होते.

...त्यांना उगीच बळीचा बकरा करु नये

यावेळी बोलताना युवकांनी आपल्या व्यासायात प्रामाणिकपणा ठेवत जिद्दीने व्यवसाय केल्यास व्यवसायात वाढ होऊन मोठे यश संपादित करता येऊ शकते, असे सांगत दादा वाजे या तरुणाचा प्रामाणिकपणा तसेच व्यवसायातील जिद्द हि युवा पिढीला प्रेरणा देणारी आहे, असे देखील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

May be an image of text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Ant of Speech सूत्रसंचालन संभाषणचातुर्य देहबोली सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास नविन बॅचसाठी प्रवेश सुरु भाषणशास्र लिडरशीप डेव्हलपमेंट गंगाविहार, नगर-पुणे रोड, षटकार कॉलनी, शिरूर, ,जि.पुणे मो.नं. 9860927799 9615927799 ई-मेल: chakrer@gmail.com f भाषण करायला शिका. या पेजवर भेट द्या.'

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: That means other women are your weakness