Arvind Kejriwal: ऑटो चालकाने दिले जेवणाचे आमंत्रण तर केजरीवाल म्हणाले...

पंजाबमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर दिल्लीचे Chief Minister अरविंद केजरीवाल सध्या पंजाब दौऱ्यावर आहेत. पंजाबमध्ये केजरीवालांनी सोमवार (दि. २२) रोजी मोगा येथे एका सभेला संबोधित केले. दरम्यान एका रिक्षावाल्याने केजरीवाल यांना घरी जेवणाचे आमंत्रण दिले.

नवी दिल्ली: पंजाबमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर दिल्लीचे Chief Minister अरविंद केजरीवाल सध्या पंजाब दौऱ्यावर आहेत. पंजाबमध्ये केजरीवालांनी सोमवार (दि. २२) रोजी मोगा येथे एका सभेला संबोधित केले. दरम्यान एका रिक्षावाल्याने केजरीवाल यांना घरी जेवणाचे आमंत्रण दिले. असता Arvind Kejriwal यांनी तात्काळ या रिक्षावाल्याचे आमंत्रण स्वीकारले असून या Auto Dirver चे नावं दिलीप तिवारी असं आहे.

Political: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दीपक केसरकरांवर जोरदार टीका

अरविंद केजरीवाल यांनी आपल्यासह इतर नेत्यांना सोबत आणू का? असं त्या ऑटो चालकाला विचारले आणि त्यांनी सोमवार (दि. २२) रोजी रात्री त्या ऑटो  चालकाच्या घरी जेवणाचा आश्वाद घेतला आहे. सोबतच अन्य एका नेत्यासोबत ऑटो राईडचा आनंदही घेतला. ऑटो चालकाने मला त्याच्या घरी जेवायला बोलावले, तेव्हा मी खूप प्रभावित झालो, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

Shirur: स्वकर्तुत्वावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारा योद्धा दादा वाजे

केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षाचे खासदार भगवंत मान आणि अन्य एका नेत्यासोबत ऑटो राईडचा आनंदही घेतला. केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले की, 'दिलीप तिवारी यांनी आम्हाला त्यांच्या घरी जेवायला बोलावले. त्याच्या कुटुंबाने खूप प्रेम दिले. अतिशय चवदार अन्न होते. मी त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आता दिल्लीत माझ्या घरी जेवायला बोलावलेय. केजरीवाल २ दिवसांच्या पंजाब दौऱ्यावर आहेत. पंजाबमध्ये 'आप'चे सरकार आल्यास प्रत्येक महिलेला दरमहा एक हजार रुपये दिले जातील, असे केजरीवाल म्हणाले. १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक महिलेला हा लाभ मिळेल आणि ही रक्कम वृद्ध मातांना वृद्धापकाळ पेन्शनपासून वेगळी असेल असं केजरीवाल म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: The auto driver gave Jevanache invitation and Kejriwal Mahna