...अन कंटेनर गेला रस्ता दुभाजकावर

पुणे-नगर रस्त्यावर कारेगाव येथील मुख्य चौकात शनिवारी (दि १९) रोजी मध्यरात्री वळणाचा अंदाज न आल्याने एक कंटेनर रस्ता दुभाजकावर गेला. त्यामुळे शनिवारी सकाळी ७ ते ९दरम्यान कारेगाव येथे वाहनांची गर्दी झाली होती.

शिरुर: पुणे-नगर रस्त्यावर कारेगाव येथील मुख्य चौकात शनिवारी (दि १९) रोजी मध्यरात्री वळणाचा अंदाज न आल्याने एक कंटेनर रस्ता दुभाजकावर गेला. त्यामुळे शनिवारी सकाळी ७ ते ९दरम्यान कारेगाव येथे वाहनांची गर्दी झाली होती. यावेळेस सुमारे १ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. क्रेनच्या साह्याने हा कंटेनर रस्ता दुभाजकावरुन खाली उतरविण्यात आला त्यानंतर वाहतुक सुरळीत झाली.

मंगलदास बांदल यांच्या अडचणीत आणखी वाढ

पुणे-नगर रस्त्यावर कारेगाव येथील मुख्य चौकात एक धोकादायक वळण आहे. पुण्याकडून अहमदनगरकडे जाणारी वाहने रात्रीच्या वेळेस वेगात असतात. त्यामुळे या धोकादायक वळणावर अनेकवेळा अपघात झालेले आहेत. त्या अपघातात अनेकजण गंभीर जखमी तर काहीजणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच सकाळी व सायंकाळी या ठिकाणी कामगारांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे या धोकादायक वळणावर वारंवार किरकोळ अपघात होत असतात.

...म्हणुन आमदार अशोक पवारांनी स्वतः चालवली गाडी

या मुख्य चौकातील धोकादायक वळणावर काही दिवसांपूर्वी ट्राफिक नियंत्रणासाठी दिवे बसवले होते. परंतु अज्ञात वाहनांनी धडक दिल्याने त्या दिव्यांचे नुकसान झाल्याने ते बंद पडले. त्यामुळे येथील अपघात टाळण्यासाठी या मुख्य चौकात कायमस्वरुपी ट्राफिक नियंत्रण दिवेबसविण्याची मागणी वाहनचालकांकडुन होत आहे. आता त्या मागणीचा विचार होणार का...? आणि यावर राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी काय निर्णय घेणार हे पाहणं गरजेचं आहे.  

 

Title: The container went to the road divider