शिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक...

शिरुर तालुक्यातील ३६ गावात १२६ कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर ८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी दिली असुन शिरुर तालुक्यात वाढता कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक असल्याचे सांगितले.

शिरुर: शिरुर तालुक्यातील ३६ गावात १२६ कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर ८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी दिली असुन शिरुर तालुक्यात वाढता कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक असल्याचे सांगितले.

पोलिसांच्या कारवाईत जुगार खेळणारी टोळी अखेर जेरबंद...

शिरुर तालुक्यात आजपर्यंत १७७९४ कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर १५५०२ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोना वर मात केली. २८७ जणांचा मृत्यू झाल असुन  २००५ विविध रुग्णालयात उपचार घेत आहे.  

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

शिरुर तालुक्यात आज सणसवाडी ९, शिक्रापूर १९, तळेगाव ढमढेरे ६, टाकळी भिमा ५, कोरेगाव भीमा १६, शिरुर ग्रामीण ४, पाबळ १०, शिरुर शहर ६, कोंढापुरी, करंजावणे, मांडवगन फराटा, वडगाव रासाई ,पिंपरखेड ,टाकळी हाजी,, तरडोबाची वाडी, निमगाव भोगी ,केंदुर, धामारी, मुखई (प्रत्येकी १), विठ्ठल वाडी, वाघाळे, ढोकसांगवी, इनामगाव, कारेगाव, मलठण कान्हुर मेसाई, कवठे यमाई, पिंपळे जगताप हिवरे (प्रत्येकी २), रांजणगाव गणपती, कुरुळी, आमदाबाद, अण्णापूर, जातेगाव खुर्द, जातेगाव बुद्रुक (प्रत्येकी ३) असे शिरुर तालुक्यातील ३६ गावात १२६ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर ८ जणांचा मृत्यू झाला.

शिक्रापूरमधील 'त्या' बोगस डॉक्टरला कोरोनाची लागण

शिरुर तालुक्यात वाढता कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक असुन नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क लावूने, गर्दी करु नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सोशल डिस्टंस पाळावे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन कराव, असे आवाहन शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे.

May be an image of text

Title: The number of corona victims in Shirur taluka is alarming
प्रतिक्रिया (1)
 
राजेंद्र जाधव
Posted on 6 May, 2021

COVID-19 ची आपल्या तालुक्यातील सद्यस्थिती काय आहे समजून घेण्यासाठी DASHBOARD वेबसाईट वर टाका. किती पोजीटीव, बरे झाले, हॉस्पिटल व घरी आहेत, व मृत्यू संख्या.

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे