शिक्रापुरातून चक्क चारचाकी पिकअप टेम्पोची चोरी...

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक ठिकाणी वाहन चोऱ्या होत असल्याने नागरिक त्रस्त झालेले असताना आता शिक्रापूर येथून एका चारचाकी पिकअप टेम्पोची चोरी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक ठिकाणी वाहन चोऱ्या होत असल्याने नागरिक त्रस्त झालेले असताना आता शिक्रापूर येथून एका चारचाकी पिकअप टेम्पोची चोरी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची सणसवाडीमध्ये पुन्हा कारवाई...

May be an image of text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Ant of Speech सूत्रसंचालन संभाषणचातुर्य देहबोली सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास नविन बॅचसाठी प्रवेश सुरु भाषणशास्र लिडरशीप डेव्हलपमेंट गंगाविहार, नगर-पुणे रोड, षटकार कॉलनी, शिरूर, ,जि.पुणे मो.नं. 9860927799 9615927799 ई-मेल: chakrer@gmail.com f भाषण करायला शिका. या पेजवर भेट द्या.'

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील हिवरे रोड परिसरात राहणारे प्रताप दौंडकर हे (दि. १४) जुलै रोजी त्यांच्या ताब्यातील एम एच ४६ ए आर ५३३४ हा पिकअप टेम्पो घराबाहेर लावून झोपले होते. त्यांनतर १५ जुलै रोजी सकाळी दौंडकर हे घराबाहेर आले असताना त्यांना घराबाहेर लावलेला टेम्पो दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी इतरत्र पाहणी केली असता त्यांना पिकअप दिसून आला नाही. त्यामुळे आपला पिकअप दिसून आला नाही.

शिरुर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या किसान खात्यातून चक्क २ लाख लंपास

याबाबत प्रताप शिवाजी दौंडकर रा. खंडाळे बिल्डींग हिवरे रोड शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. कन्हेरसर ता. खेड जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हावलदार मंगेश लांडगे हे करत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Theft of a four wheeler pickup tempo from Shikrapur