...त्यांना उगीच बळीचा बकरा करु नये

शरद पवार हे देशाचे नेते आहेत ते धोकेबाज नाहीत. पवार हे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार असतील तर आमच्या शुभेच्छा असतील. मात्र, ते निवडून येणार नाहीत. त्यांना उगीच बळीचा बकरा करु नये, असे त्यांनी सांगितले.

पुणे: केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले हे पुणे दौऱ्यावर असुन त्यांनी विविध घडामोडीं संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शरद पवार हे देशाचे नेते आहेत ते धोकेबाज नाहीत. पवार हे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार असतील तर आमच्या शुभेच्छा असतील. मात्र, ते निवडून येणार नाहीत. त्यांना उगीच बळीचा बकरा करु नये, असे त्यांनी सांगितले.

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची सणसवाडीमध्ये पुन्हा कारवाई...

आठवले म्हणाले, जातनिहाय जनगणना झाल्याने जातीयवाद वाढेल या मताचा मी नाही. जातनिहाय जनगणना झाली तर कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व द्यायचे हे नेमकेपणाने ठरविता येईल. ओबीसी समाजाची जनगणना आवश्यक आहे. यापूर्वी जो ओबीसींचा डाटा तयार केला आहे तो अंजानुसार आहे. त्यामुळे केंद्र सरकार तो डाटा देत नसल्याचे स्पष्ट केले.

पिंपळे जगताप मधून कत्तलीला चाललेल्या चौदा गोमातेंना जीवदान

May be an image of text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Ant of Speech सूत्रसंचालन संभाषणचातुर्य देहबोली सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास नविन बॅचसाठी प्रवेश सुरु भाषणशास्र लिडरशीप डेव्हलपमेंट गंगाविहार, नगर-पुणे रोड, षटकार कॉलनी, शिरूर, ,जि.पुणे मो.नं. 9860927799 9615927799 ई-मेल: chakrer@gmail.com f भाषण करायला शिका. या पेजवर भेट द्या.'

उद्धव ठाकरे सरकारमध्ये शरद पवार यांच्यामुळे ताळमेळ नाही. शिवसेनेला जर बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचे असल्यास त्यांनी भाजपसोबत यावे. आमदार फुटतील या भीतीने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगत राज्याला मराठा आरक्षणाचे अधिकार देण्यासाठी संसदेने ठराव मंजूर करावा, अशी मागणी आम्ही केली आहे असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: They should not be made scapegoats at all