एकेकाळी पेट्रोल पंपावर काम करायची ही अभिनेत्री पण आज...

कलेवर एखाद्याची निष्ठा, प्रेम असेल तर त्या कलेसाठी ती व्यक्ती काहीही करायला तयार असते. वाटेत कितीही संकटं आली तरी ती व्यक्ती डगमगत नाही. त्यावर मात करत कलेसाठी सर्वस्व पणाला अर्पण करणारे समाजात मोजकेच असतात. अशाच कलाप्रेमी व्यक्तींमध्ये मुग्धा गोडसेचे नाव गणले जाते. तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते हेच मुग्धाने सिद्ध करुन दाखवलंय.

मुंबई: कलेवर एखाद्याची निष्ठा, प्रेम असेल तर त्या कलेसाठी ती व्यक्ती काहीही करायला तयार असते. वाटेत कितीही संकटं आली तरी ती व्यक्ती डगमगत नाही. त्यावर मात करत कलेसाठी सर्वस्व पणाला अर्पण करणारे समाजात मोजकेच असतात. अशाच कलाप्रेमी व्यक्तींमध्ये मुग्धा गोडसेचे नाव गणले जाते. तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते हेच मुग्धाने सिद्ध करुन दाखवलंय.

एका वृत्तवाहिनीच्या बातमीसाठी शिक्रापुरात उसळली गर्दी

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

मुग्धाने २००२ मध्ये मेगा मॉडेल हंट जिंकून तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीची सुरुवात केली. यानंतर मुग्धाला बर्‍याच मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. २००४ साली मुग्धाने मिस इंडिया स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. बॉलिवूडमध्ये येण्यापुर्वी मुग्धाने 'चूप चप खडसे हो', 'लेकर हम दीवाना दिल' अशा अनेक हिंदी अल्बममध्ये काम केले आहे. मधुर भंडारकर दिग्दर्शित 'फॅशन' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या या मुग्धाचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आक्रमक इशारा

May be an image of text

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली मुग्धा एकेकाळी पेट्रोल पंपावर तेल विकून केवळ १०० रुपयांमध्ये आपला उदरनिर्वाह करायची. तर पॉकेट मनीच्या रुपात घरुन तिला केवळ ३०० रुपये मिळायचे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुग्धा लहान-मोठे काम करायची. आर्थिक हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम करण्याची मुग्धाची तयारी होती. त्यामुळे तिने अगदी लहान काम करायला सुरुवात केली होती. मुग्धाचाही आयुष्यात दररोज संघर्ष होता. मात्र कधीच हार मानली नाही. उलट यातूनच नवीन नवीन गोष्टी करता करता ती मॉडेलिंग क्षेत्रात एंट्री झाली. कुणीही गॉडफादर नसताना मुग्धाने आज मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

May be an image of text that says 'मो.नं. भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

...अन कंपनीला आग लागुन झाले लाखोंचे नुकसान

मुग्धा गोडसे आता तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. मुग्धाने नुकतेच राहुल सोबत तिचे असलेले रिलेशनशीपबद्दल खुलासा केला आहे. तिने सांगितले की, "राहुलसोबत असल्याची एक स्पेशल भावना मनात आहे. आमच्या दोघांच्या घरच्यांना आमच्या नात्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. सध्या लग्नाचा विचार केला नसून जेव्हा व्हायचे असेल तेव्हा लग्न होईल" असे तिने सांगितले. राहुल आणि मुग्धा नेहमी एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात. मुग्धाच्या इन्सटाग्रामवर नजर टाकली असता तिचे अकाउंट राहुल सोबतच्या फोटोंनी भरलेले आहे.

Title: This actress used to work at a petrol pump but today
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे