सातत्याने गाडीत AC सुरू असल्यास मायलेजवर होतो परिणाम? घ्या जाणून...

मोटार चालवताना एसी सुरु ठेवल्यानंतर मायलेजवर परिणाम होतो का नाही, याबद्दल अनेकजण विचार करत असतात.

नवी दिल्ली: मोटार चालवताना एसी सुरु ठेवल्यानंतर मायलेजवर परिणाम होतो का नाही, याबद्दल अनेकजण विचार करत असतात. इंधनाचे दर वाढत असल्यामुळे एसी सुरू ठेवावा की नको, असाही प्रश्न अनेकांना पडतो. एसीमुळे काय परिणाम होतो, याबद्दल जाणून घेऊयात...

प्रत्येक गाडीचा टायर काळ्या रंगाचाच का असतो बरं? घ्या जाणून...

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले भाव पाहता, गाडीचे मायलेज कसे वाढवता येईल याकडे सर्वच जण लक्ष देत आहेत. यातच मोटार चालवताना कारमधील एसी वापरल्यामुळे गाडीचे मायलेज कमी होत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. एसीमुळे गाडीचे मायलेज कमी होते. त्यामुळे कित्येक लोकांनी एसी वापरण्याऐवजी कारच्या खिडक्या उघड्या ठेवण्यास सुरुवात केली आहे.

मांजरीने मालकासाठी दिली अर्धा तास विषारी 'कोब्रा'शी झुंज...

एसीमुळे मायलेजवर खरंच परिणाम होतो का, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रथम कारमधील एसी कसा काम करतो ते पाहूया... 
गाडीतील एसीला अल्टरनेटरने एनर्जी मिळते. अल्टरनेटर हे गाडीच्या इंजिनशी जोडलेले असते. म्हणजेच, एसी सुरू केल्यास गाडीच्या इंजिनवर अधिक भार येतो. गाडीचे इंजिन उर्जेसाठी फ्युअल टँकमधील फ्युअलचा वापर करते. कारमधील एसी हा गाडीच्या इंधनावरच चालतो. यामुळेच एसीचा जास्त वापर केल्यामुळे मायलेज कमी होत असल्याचा दावा केला जातो. 

जगातील सर्वांत ठेंगण्या गायीला पाहण्यासाठी उसळली गर्दी...

एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, 'गाडीचे मायलेज कमी होत असले, तरी ते केवळ 5 ते 7 टक्क्यांनी कमी होते. त्यामुळे एसीचा वापर कमी करण्याची वा टाळण्याची गरज नाही. उलट एसीचा वापर टाळल्यामुळे तुमच्या गाडीच्या मायलेजवर परिणाम होतो. एसीचा वापर टाळण्यासाठी अनेकजण गाडीच्या खिडक्या उघड्या ठेवतात. गाडी वेगात असल्यावर या खिडकीमधून बाहेरची हवा मोठ्या प्रमाणात गाडीच्या आत येते. त्यामुळे गाडीवरील दबाव वाढून, पुढे जाण्यासाठी इंजिनला जास्त ताकद लावावी लागते. परिणामी इंजिन जास्तीत जास्त फ्युअलचा वापर करते. एकंदरीत, एसी बंद ठेऊन खिडक्या उघडणे हे आपल्याला जास्त तोट्यात आणू शकते. त्यामुळे शक्यतो गाडीच्या खिडक्या बंद ठेऊन, एसीचा वापर करावा.'

Shocking Video: नाकात साप घालून काढला तोंडातून बाहेर...

Video: नागाने कोंबडीसह खाल्ली पाच अंडी

Video: बापरे! दारूच्या नशेत युवक भिडला नागाला अन्...

Video: महिला कार चालवत असताना नागाने काढला फणा

Video: खेकडा मारतोय सिगारेटचे झुरक्यावर झुरके

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: tips for car maintenance effect of continuously running ac o