चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते 'अजिंक्य देव' यांचा आज वाढदिवस...

चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते 'अजिंक्य देव' यांचा आज वाढदिवस… जेष्ठ अभिनेते 'रमेश देव' आणि सीमाताई यांचे पुत्र अजिंक्य देव आहे. त्यांचा जन्म ३ मे १९६३ रोजी झाला. त्यांनी आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात आपली कारकीर्द घडवली.

पुणे: चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते 'अजिंक्य देव' यांचा आज वाढदिवस… जेष्ठ अभिनेते 'रमेश देव' आणि सीमाताई यांचे पुत्र अजिंक्य देव आहे. त्यांचा जन्म ३ मे १९६३ रोजी झाला. त्यांनी आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात आपली कारकीर्द घडवली.

सोशल डिस्टंसिंग: नवरा-नवरीने काठ्यांच्या मदतीने घातले गळ्यात हार

'अजिंक्य देव' अतिशय हुशार, हरहुन्नरी असे कलाकार… दिमाखदार व्यक्तिमत्व, आवाजातील ठेहराव ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खास पैलू. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी 'अर्धांगी' या मराठी चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

मात्र अजिंक्य यांना खरी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे, १९८७ साली आलेल्या 'सर्जा' या मराठी चित्रपटातून अफलातून संवाद, मंत्र मुग्ध करणारी गाणी असे सर्वच काही या चित्रपटात होते. 'सर्जा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता.

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

आज मराठीतील एक प्रगल्भ अभिनेते म्हणून अजिंक्य देव यांची ओळख आहे. त्यांचा एक विशिष्ट असा मोठा चाहता वर्ग आहे. नुकतंच आलेल्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटातील अजिंक्य देव यांच्या भूमिकेचे सर्वच स्तरावर जोरदार कौतुक झाले.

अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखनाबरोबरच चित्रकलेची आणि अनेक खेळांचीही आवड जोपासणाऱ्या 'अजिंक्य देव' यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Video: आईला तडफडत असताना मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन

Title: Today is the birthday of famous actor Ajinkya Dev
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे