शिरुर तालुक्यात आईच्या अंत्यविधीची राख झाडांच्या मुळांना टाकत वृक्षारोपण...

जातेगाव खुर्दच्या मासळकर कुटुंबीयांचा अनोखा उपक्रम

जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील एका कुटबियांनी आपल्या आईच्या अंत्यविधी नंतर अंत्यविधीची राख संकलित करत दशक्रिया निमित्ताने अंत्यविधीची राख झाडांच्या मुळांशी टाकून स्मशान भूमी परिसरात देशी झाडांचे वृक्षारोपण करत समाजाला अनोखा संदेश दिला आहे.

शिक्रापूर: जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील एका कुटबियांनी आपल्या आईच्या अंत्यविधी नंतर अंत्यविधीची राख संकलित करत दशक्रिया निमित्ताने अंत्यविधीची राख झाडांच्या मुळांशी टाकून स्मशान भूमी परिसरात देशी झाडांचे वृक्षारोपण करत समाजाला अनोखा संदेश दिला आहे.

...अन ग्रामपंचायत कार्यालयात लावला खासगी व्यक्तीचा फोटो

जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील आदर्श माता व आदर्श शिक्षिका असलेल्या कमल ज्ञानेश्वर मासळकर यांचे नुकतेच निधन झाले असताना आपल्या आईने अनेक विद्यार्थी घडवीत समाजामध्ये आदर्श निर्माण करुन शासनाकडून आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळविला होता. त्यामुळे आपण देखील आईच्या स्मृती निमित्ताने आदर्श कार्य करण्याचा संकल्प त्यांच्या मुलांसह कुटुंबीयांनी केला. त्यांनतर (दि. २०) जून रोजी आदर्श शिक्षिका कमल ज्ञानेश्वर मासळकर यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने त्यांची आठवण म्हणून स्मशानभूमी परिसरात अंत्यविधीची राख झाडांच्या मुळाशी टाकत वड व पिंपळ या देशी झाडांचे वृक्षारोपण केले.

समाजपयोगी कार्याला साथ देणे गरजेचे; हरिष येवले

...अन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या दोन चुली कायम

याप्रसंगी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप, पुणे कृषी विद्यापीठाचे प्राचार्य सुनील ज्ञानेश्वर मासळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश मासळकर, पोलीस निरीक्षक स्वप्निल मासळकर, प्रगतशील शेतकरी अभिजीत मासळकर, जातेगाव खुर्द चे उपसरपंच विकास मासळकर, महेश मासळकर, फत्तेसिंग जगताप, कवस काशीद, किसन गजरे, समीर खंडाळे, गणेश मासळकर यांसह आदी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. दरम्यान आमदार अशोक पवार यांनी मासळकर परिवाराने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

May be an image of text that says

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Tree planting in Shirur taluka by burying the ashes of mothe