...अन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या दोन चुली कायम

गावामध्ये लावण्यात आले एकाच गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाचे फलक

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये २ गटांमधून एका गटाचा सरपंच व एका गटाचा उपसरपंच सत्तेत विराजमान झालेला असताना यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळे कार्यक्रम घेत वेगवेगळ्या चुली मांडल्या होत्या. मात्र नंतर एकत्र काम करणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले असताना देखील सध्या पुन्हा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या २ वेगवेगळ्या चुली असल्याचे दिसून येत आहे.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये २ गटांमधून एका गटाचा सरपंच व एका गटाचा उपसरपंच सत्तेत विराजमान झालेला असताना यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळे कार्यक्रम घेत वेगवेगळ्या चुली मांडल्या होत्या. मात्र नंतर एकत्र काम करणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले असताना देखील सध्या पुन्हा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या २ वेगवेगळ्या चुली असल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांच्या पथकाची मटका अड्ड्यावर छापा टाकत धडक कारवाई...

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे १७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत मध्ये सध्या एका गटाचे ९ तर एका गटाचे ८ सदस्य असून सरपंच एका गटाचा व उपसरपंच एका गटाचा अशी स्थिती आहे. मात्र गावातील विकास कामांच्या चर्चेमध्ये दोन्ही गटात मतभेद असून अनेक कार्यक्रम देखील दोन्ही गटांकडून वेगवेगळ्या पद्धतीने केले जात असताना वारंवार कामांच्या बाबत दोन्ही गटात मतभेद होत असतात.

रांजणगाव पोलिसांनी मोबाईल चोरांना केले २ तासात अटक

May be an image of text that says

सध्या शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने गावातील सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या नावाचे फलक लावण्याचे काम हाती घेण्यात आलेले असताना उपसरपंच गटाच्या उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य मयूर करंजे, सारिका सासवडे, वंदना भुजबळ, रमेश थोरात, विशाल खरपुडे, पूजा भुजबळ, मोहिनी मांढरे, सिमा लांडे यांनी अचानकपणे आपले स्वतंत्र नामफलक तयार करुन त्यांच्या घराच्या परिसरात लावले आहेत. मात्र सरपंच तसेच इतर ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाचे फलक अद्याप लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गावामध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या दोन्ही गटांचे वेगवेगळ्या पद्धतीने चाललेले काम उघडपणे दिसून येत आहे. मात्र गावाच्या विकासासाठी दोन्ही गट एकत्र येऊन काम करणार कि नाही, असा सवाल नागरिकांसह ग्रामस्थांना पडला आहे.

विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्याला हातपाय तोडण्याची धमकी...

ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे छापण्यात आलेले सर्व सतरा बोर्ड तयार आहेत. मात्र ९ पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतचे फलक लावण्यापुर्वीच स्वतः फलक तयार करुन लावले असल्याचे सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले.

शिक्रापुरात पावसाच्या तडाख्याने झाड रस्त्यावर...

सदर फलकांसाठी २ जणांकडून कोटीशन मागवण्यात आलेले होते. मात्र ग्रामपंचायत मधील सदर नऊ जणांनी स्वतः दुसऱ्या ठिकाणी फलक बनवायला लावून त्यांचे फलक लावून घेतले आहेत. उर्वरित सर्व पदाधिकाऱ्यांच्या नावाचे देखील फलक लवकरच लावले जातील, असे ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: two stoves of Gram Panchayat office bearers remain