'त्या' विमा कंपन्यांवर अजित पवार संतापले म्हणाले...

सोयाबीन (Soybean), कापूस (Kapus) उत्पादकांसह राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार (State government) ठामपणे उभे असून केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी (Question) राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे.

मुंबई: सोयाबीन (Soybean), कापूस (Kapus) उत्पादकांसह राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार (State government) ठामपणे उभे असून केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी (Question) राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात महाविकास आघाडीचे खासदार यासंबंधीचे प्रश्न सभागृहात मांडतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Reshning: रेशनबाबत केंद्र सरकारचा महत्त्वपुर्ण निर्णय

अजित पवार म्हणाले, राज्यातील अतिवृष्टी बाधितांना राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मदतीचे वाटप सुरु आहे. शेतकऱ्यांना दिलेले अनुदान तसेच आर्थिक मदत कोणत्याही परिस्थितीत बॅंकांनी रोखू नये. सदरची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येऊ नये, याबाबतच्या सूचना संबंधित बॅंकांना देण्यात येतील. खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हे नोंद करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तळेगाव ढमढेरेत घरा शेजारील झाड तोडल्याने दोन गटात हाणामारी...

नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनी तयार करण्यासाठी रोजगार हमी योजनेसह 'CSR' फंडातून मदत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कृषीपंपांना दिवसा सुरळीत आणि पुरेसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने सौरपंपाची योजना आणली आहे, ही योजना अधिक सक्षमपणे राबविण्यात यावी. कर्जमाफीला पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरुर तालुक्यातील विद्यार्थी कोरोनातून सुटले अन...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Tya insurance company Ajit Pawar Santapale Mhanale