सणसवाडीत कंपनीच्या युनियनच्या कामगारांना बेदम मारहाण

सणसवाडी (ता. शिरुर) येथील एल & टी फाटा येथून कंपनी कामगार घेऊन जाणाऱ्या बसला रात्रीच्या सुमारास अडवून कामगारांना बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सहा अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील एल & टी फाटा येथून कंपनी कामगार घेऊन जाणाऱ्या बसला रात्रीच्या सुमारास अडवून कामगारांना बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सहा अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

लुसि कुरियन यांचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान...

सणसवाडी (ता. शिरुर) येथील पॉलिबाँड रबर कंपनीतील कंपनी कामगार कंपनीच्या बस मधून रात्री १० वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना एल & टी फाटा रस्त्यावर अचानकपणे आलेल्या काळ्या रंगाच्या कार मधील युवकांनी कंपनीचे कामगार घेऊन जाणारी बस अडवली. दरम्यान अज्ञात ६ युवक लाकडी दांडके, स्टंप, काठ्या घेऊन बसमध्ये घुसले त्यांनी कंपनी कामगारांना तुम्ही युनियन करता का असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडके व काठ्यांनी बेदम मारहाण केली, या झालेल्या मारहाणीमध्ये कंपनीचे पोपट चव्हाण, सरदार मिश्रा, रवींद्र दळवी, सिद्धांत खैरे हे कामगार जबर जखमी झाले आहे.

शिरुर तालुक्यातील संयुक्त पथकांद्वारे होणार कंपन्यांची तपासणी
 
याबाबत पॉलिबाँड रबर कंपनीचे कामगार व पॉलिबाँड कामगार संघटनेचे सभासद पोपट भीमराव चव्हाण यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ६ अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब थिकोळे हे करत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Union workers beaten to death in Sanaswadi
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे