शिरुर तालुक्यात आई वडिलांच्या स्मरणार्थ अनोखा उपक्रम...

मधुकर खोल्लम यांच्याकडुन विद्यालयाला विहिर खोद कामासाठी आर्थिक मदत

आई वडील कै. माणिकबाई प्रभाकर खोल्लम व प्रभाकर विश्वनाथ खोल्लम यांच्या स्मरणार्थ विद्यालयासाठी विहिर खोदकाम व बांधकाम करण्यासाठी रुपये २ लक्ष रुपयाची मदत उदार अंतकरणाने केली. विहिरीच्या कामाचे व भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कवठे येमाई: कवठे येमाई (ता. शिरुर) येथील न्यु इंग्लिश स्कुलच्या विदयार्थ्याना नेहमीच भेडसावत असणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गंभीरता लक्षात घेऊन कवठे येमाई गावचे सुपुत्र व न्यु इंग्लिश स्कुलचे माजी विद्यार्थी मधुकर प्रभाकर खोल्लम चार्टड अकाउंटन्ट यांनी आपले आई वडील कै. माणिकबाई प्रभाकर खोल्लम व प्रभाकर विश्वनाथ खोल्लम यांच्या स्मरणार्थ विद्यालयासाठी विहिर खोदकाम व बांधकाम करण्यासाठी रुपये २ लक्ष रुपयाची मदत उदार अंतकरणाने केली. विहिरीच्या कामाचे व भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शिरुर तालुक्यात देवेंद्र सामाजिक वृक्ष सप्ताहाची सुरुवात...

May be an image of text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Ant of Speech सूत्रसंचालन संभाषणचातुर्य देहबोली सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास नविन बॅचसाठी प्रवेश सुरु भाषणशास्र लिडरशीप डेव्हलपमेंट गंगाविहार, नगर-पुणे रोड, षटकार कॉलनी, शिरूर, ,जि.पुणे मो.नं. 9860927799 9615927799 ई-मेल: chakrer@gmail.com f भाषण करायला शिका. या पेजवर भेट द्या.'

याप्रसंगी स्थानिक स्कुल कमिटी अध्यक्ष अर्जुन सांडभोर, माजी पं.स. सदस्या कल्पना पोकळे, सरपंच रामदास सांडभोर, उपसरपंच निखिल घोडे, ग्रा. पं. सदस्य पांडुरंग भोर, रामदास इचके, राजेंद्र इचके, बाळासाहेब डांगे, मिठुकाका बाफणा, रितेश शहा, स्थानिक स्कुल कमिटी सदस्य बाळासाहेब बाफणा, माजी चेअरमन काशीनाथ पोकळे, माजी उपसरपंच अंकुश शिंदे, फक्कड सांडभोर, अशोक गाडेकर, रोहिदास हिलाळ, प्रमोद घाटकर, अशोक नानेकर, संजय कदम, बाबाजी जाधव, रंगनाथ भोर, गणेश जोशी, राजेंद्र कांदळकर, युवानेते अविनाश पोकळे, ऋषिकेश सांडभोर, सोपान वागदरे, धनश्री लँड डेव्हलपर्सचे आबा वागदरे, शाळेतील शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

बारा बलुतेदार महासंघच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भगवान श्रीमंदिलकर

यावेळी मधुकर खोल्लम म्हणाले की, आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो त्याची उतराई आपण केली पाहीजे, असे नेहमी वाटत होते. ज्या ज्या वेळी गावी येत होतो त्यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या अडचण स्थानिक स्कुल कमिटी व ग्रामस्थ सांगत होते. पिण्याच्या पाण्याच्या कायमस्वरुपी अडचण दुर करण्यासाठी शाळेला विहिर खोदुन देण्याचा मी आणि माझ्या कुटुंबाने निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या विधवा महिलांना शासनाने मदत द्यावी...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Unique activities in memory of parents in Shirur taluka