Video: याला म्हणतात ओळख...

लस मिळवण्यासाठी केलेले काम पाहून सगळेच हैराण झाले आहेत. व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरेनासे होत आहे.

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. लस मिळवण्यासाठी काही जण पैसे देत आहेत तर काही विविध जुगाड करून लस मिळवत आहेत. अनेकजण तर तासंतास रांगेत उभा राहून लस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सातत्याने गाडीत AC सुरू असल्यास मायलेजवर होतो परिणाम? घ्या जाणून...

लस मिळवण्यासाठी केलेले काम पाहून सगळेच हैराण झाले आहेत. व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरेनासे होत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक व्यक्ती दोन भिंतींच्या मध्ये स्पाईडरमॅनप्रमाणे लटकत खिडकीपर्यंत पोहोचतो. आणखी एक विशेष बाब म्हणजे इथे पोहताच आरोग्य कर्मचारी खिडकीतून त्याला लसही देतो. अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये त्यांचं डोकं अतिशय चालते.'

व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळते, 'लसीकरण केंद्रासमोर भलीमोठी रांग लागलेली आहे. याच कारणामुळे, या व्यक्तीने अशाप्रकारे भिंतीवर लटकून जात लस घेण्याची रिस्क घेतली. त्याला रांगेत उभा राहायचे नव्हते आणि कदाचित याच कारणामुळे त्याने याबाबत आधीच आरोग्य कर्मचाऱ्यासोबत बोलून घेतले होते. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍप आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. पण, व्हिडिओ कोणत्या भागातील आहे, याबद्दलची माहिती मिळू शकली नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

प्रत्येक गाडीचा टायर काळ्या रंगाचाच का असतो बरं? घ्या जाणून...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Vaccination Video Viral on social media funny comment