शिरुर तालुक्यातील कोरोना रुग्णाने शेअर केला हॉस्पिटलमधील धक्कादायक अनुभव...

कोरोनाची लागण झालेले वैभव चौधरी यांनी करडे येथील बांदल हॉस्पिटल आणि पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमधील मांडलेला अनुभव...

शिरूरः राज्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये अनेक रुग्णांना आणि नातेवाईकांना वेगवेगळे अनुभव येत आहेत. किंबहुणा काही ठिकाणी चांगले तर काही ठिकाणी वाईट. ठिकठिकाणी डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे डॉक्टर रुग्णांना लुटत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. काही रुग्ण आपली कैफीयत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत आहेत.

अबब! युवतीने एकाच वेळी दिला नऊ बाळांना जन्म

कोरोनाची लागण झालेले वैभव चौधरी यांनी करडे येथील बांदल हॉस्पिटल आणि पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमधील मांडलेला अनुभव...

आज मला दवाखान्यातुन डिस्चार्ज मिळाला. मी 28 तारखेला वेळ 4 ते 5 च्या दरम्यान बांदल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो. 30 तारखेला 4 वाजता माझी तब्येत बिघडल्यामुळे डॉ. उल्हास बांदल यांच्या सल्ल्यानुसार मला पुण्याला शिफ्ट करण्यात आले. 30 तारखेला 7 ते 7:30 च्या दरम्यान मी पुण्यात सह्याद्री हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथे ऍडमिट झालो. त्या दिवसापासून आज पर्यंत दि.15/4/21 पर्यंत हॉस्पिटलमध्ये होतो. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मला जे उपचार मिळाले त्यामुळे मी अत्यंत खुश आहे. त्या ठिकाणी त्यांची पूर्ण टीम 24 तास रुग्णाच्या सेवेसाठी उपलब्ध होती. तिथे मला मी घरीच असल्याचा अनुभव आला. इतक्या मनमिळाऊ वातावरणात तिथे माझ्यावर उपचार झाले. त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णासाठी जेवणाची व्यवस्था केलेली होती. त्यामुळे घरून डबा मागवण्याची गरज न्हवती.

Video: कुकरमध्ये महिलेने केल्या चपात्या; कशा ते पाहाच...

Image

तिथे मला मिळालेल्या सुविधा  -
सकाळी 8:30 वाजता नाष्टा. (पोहे किंवा उपिट) तुम्हाला वाटेल तो तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्याबरोबर चहा.
1 वाजता जेवण आणि जेवणात 3 भाज्या, 3 चपात्या, आणि राइस. आणि पुन्हा 4 वाजता चहा आणि रात्री 8 ते 8:30 दरम्यान जेवण.
मी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 30 तारखेपासून ते आज पर्यंत म्हणजे 15 तारखे पर्यंत 16 दिवस तिथे राहिलो. या सोळा दिवसात हॉस्पिटलंच बिल + मेडिकलंच बिल+ 30 तारखेपासून ते 12 तारखे पर्यंत मी ऑक्सिजन वर होतो (12 लिटर वर होता) + माझे 3 x-ray , माझ्या रक्ताच्या चाचण्या + 3 रेमेडिसवर इंजेक्शन + माझं सकाळी एक टाइमचा नाष्टा, 2 वेळेचं जेवण आणि सकाळ संध्याकाळ चहा. या सर्व गोष्टींचे बिल फक्त 98515 रुपये. म्हणजे 98515 ÷ 16 = 6157.18 रुपये रोजचा खर्च. सह्याद्री हॉस्पिटलबद्दल सांगायला नको. ते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. एवढया मोठ्या हॉस्पिटलमध्ये माझं बिल एवढं कमी आणि सुविधा एकदम उत्तम.

शिरूर तालुक्यात लग्नाचे आमीष दाखवून महिलेवर बलात्कार...

पण जेव्हा मी या हॉस्पिटलची करड्याच्या बांदल हॉस्पिटल बरोबर तुलना करतो त्यावेळेस माझा मेंदू विचार करायचा बंद होतो.
बांदल हॉस्पिटलमध्ये कुठल्याच सुविधा नाही. ना त्या हॉस्पिटल ने मला चहा दिला , ना जेवण दिले, ना ऑक्सिजन दिला, तरी दोन दिवसांच बिल मेडिकल सहित 25500 झालं. आणि प्लस माझ्या रक्ताच्या चाचण्यांचे हॉस्पिटलमध्ये 1700 आणि swab चे 1200 हे अतिरिक्त चार्जेस. आणि हॉस्पिटलचा रोज खर्च 12750. सटकली ना तुमची पण. 12750 रोजचा खर्च! आल्याना मेंदूला मुंग्या. येणारच की!
मी जर हे उपचार बांदल हॉस्पिटलमध्ये 16 दिवस घेतले असते तर 16× 12750= 204000 एवढं बिल झालं असतं. प्लस मला जेवण सुद्धा घरून मागावा लागलं असतं आणि मला ऑक्सिजन सुद्धा मिळाला नसता. रेमेडिसवर इंजेक्शन सुद्धा बाहेरून आणावे लागले असते. पूर्णपणे मला उध्वस्त केलं असतं ह्या हॉस्पिटलने.

मला बांदल हॉस्पिटल खटकण्याचे काही कारणे-
28 ला तारखेला ज्या वेळेस मी तिथे बेड मिळत न्हवता म्हणून बांदल हॉस्पिटलमध्ये बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था असल्यामुळे मी तिथे ऍडमिट झालो. ऍडमिट होण्याच्या वेळेस डॉ. बांदल म्हणाले हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध आहे. त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो. पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर दुसऱ्या दिवशी मला थोडा दम लागतोय म्हणून मला ऑक्सिजन द्या म्हणून म्हणालो असता डॉ. ने मला ऑक्सिजन लावला नाही. मी त्यांना ऑक्सिजन लावा बोलतोय आणि ते माझ्या मागे सारखा तगादा लावत होते की रेमेडिसवर इंजेक्शन घेऊन ये. मी त्यांना म्हणायचो हॉस्पिटलमधून शिफारस करा आणि मला उपलब्ध करून घ्या. पण डॉ. बोलायचे काही करून इंजेक्शन घेऊन या. आम्हाला भेटत नाही. बाहेर जिकडे मिळेल तिकडून आणा. आजचा रेट 45000 आहे बाहेर. हॉस्पिटलमधून रेमेडिसवर उपलब्ध करून घ्या बोललो तर हॉस्पिटलला आता पर्यंत फक्त 2 दोनच इंजेक्शन भेटलेत अस मला सांगण्यात आलं. 28 तारखेला बांदल हॉस्पिटलमध्ये 4 रेमेडिसवर आले होते. डॉ. बोलत होते आम्हाला आत्ता पर्यंत दोनच इंजेक्शन मिळाले आहेत.

मुद्दा दुसरा- मी सतत मला ऑक्सिजन लावा सांगत असूनही त्यांनी मला ऑक्सिजन लावला नाही. उलट इंजेक्शन ची सारखी मागणी करू लागले. मला प्लाझ्मा सुद्धा दिला त्याचे 12000 वेगळे.

...अन् शिरूर तालुक्यातील कार्यकर्त्याची झाली बोलती बंद!

मुद्दा न 3- माझा ऑक्सिजन लेव्हल 30 तारखेला 11 वाजता 80 वर आली. तर लगेच बांदल हॉस्पिटलने त्याचे अंग काढून घेतले आणि पेशंटला 3 तासात काही करून इथून हलवा म्हणून घरच्यांच्या मागे लागले. आणि माझ्याकडे ऑक्सिजन उपलब्ध नाही आणि मी फक्त 2 तास ऑक्सिजन देऊ शकतो.. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ऍडमिट होताना आमच्याकडे सगळं आहे असं सांगून ऍडमिट केलं आणि टायमाला हात वरून धोका दिला. त्यांनी मला 2 तास ऑक्सिजन दिला तो पर्यंत आम्ही कुठे बेड मिळतोय का ते पहात होतो. तर काही मित्रांच्या मदतीने सह्यादी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाला. पण तो बेड तात्काळ ताब्यात घेणं गरजेचं होतं. त्यांनी 6 चा टाइम आम्हाला दिला होता. इथे आम्ही 4 वाजले तरी हॉस्पिटलमध्येच होतो.

...अन MBBS डॉक्टरच निघाला मुन्नाभाई

डॉ. उल्हास बांदल आणि माझे मामा रवींद्र लंघे हे चांगले मित्र असल्यामुळे माझे मामा मला म्हणाले डॉ. च्या बिलाच नको टेन्शन घेऊ डॉ. आपलाच आहे. बिल दोन दिवसाने दिले तरी चालेल पण तू आधी पुण्याला ऍडमिट हो. डॉ. ने माझ्या मामाचा सुद्धा फोन उचलला नाही. आणि माझ्या मामी त्याठिकाणी विचारपूस करण्या करता आली असता त्यांना उलटी उत्तरे देण्यात आली. डॉ. बांदल हे मला लहान पनापासून ओळखत असल्यामुळे माझ्याबरोबर हॉस्पिटल गैरव्यवहार करणार नाही याच्यावर ठाम होतो. पण घडलं ते उलटंच. गावातला दवाखाना आहे, गावातल्या लोकांच्या मदतीला त्याने धावून आले पाहिजे आपण काही दवाखान्यासाठी अपरिचित न्हवतो. पण दवाखान्याने ह्या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारल्या. मी मेडिकलवाल्या भैय्याला म्हणालो आता मला पुण्याला जायचंय उद्या पैसे देतो. कारण माझ्याबरोबर जे घडलं होत ते एकदम इमर्जन्सी मध्ये घडलं होतं. आणि पुण्याला गेल्यावर मला जर तिथे पैसे भरायला कमी पडले तर काय करायचं म्हणून मी त्यांना म्हणलो उद्या पैसे देतो. तर त्यांनी नाहीचा पाढा लावला. एकतर हॉस्पिटलने टाइमला हात वर केले मग अशा परिस्थितीत त्यांनी ह्या गोष्टी समजून घ्यायला हव्या होत्या पण त्या त्यांनी समजून घेतल्या नाही. सगळ्यात जास्त नालायक पणा हॉस्पिटलने इथे केला. मला साथ द्याच्या वेळेस मला अशी वागणूक देण्यात आली. सगळ्यात अति म्हणजे जो कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरतो असा गावातल्या एका डॉ. गावातल्या एका व्यक्ती बरोबर असं नीच कृत्य केलं ते म्हणजे माझी हॉस्पिटलची फाइल जप्त केली.  अशा इमर्जन्सी वेळेस अशी नीच पणे वागताना त्यांच्या मेंदूला काय बुरशी लागली होती. आता कुठं गेलं होतं त्यांचं गावपण. त्या क्षणी मला इतकी चीड आली होती की आपल्या ओळखीचा माणूस आपल्या बरोबर अशा या प्रसंगी इतकं नीच आणि क्रूर वागतोय. मला त्याच वेळेस त्यांना तुडवण्याची इच्छा झाली होती पण माझी परिस्थिती बिघडली होती. त्यामुळे त्यांच्या तोंडावर पैसे मारून मी पुण्याला निघून गेलो. मला काही मित्रांचे फोन आले त्यांनी आमदार अशोक पवार यांच्याशी बोलणं केलं होतं. आणि अशोक पवार म्हणाले त्याला बिल वगैरे द्यायची काही गरज नाही आधी पुण्याला ऍडमिट हो आणि मग बिलाचं काय होईल ते पाहू असं आश्वासन अशोक पवार यांनी दिल. पण मी मित्रांना झाला तो सगळ्या प्रकार सांगितला. त्यांना ही ह्या घटनेची खूप चीड आली ते हॉस्पिटलमध्ये येऊन तिथे भांडण करणार होते पण मी त्यांना सांगितले काय असेल ते नंतर बघू आणि त्यांना शांत केलं.
सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा म्हणजे मी जीव तोडून सांगतोय माझ्या बरोबर बांदल हॉस्पिटलमध्ये गैरव्यवहार झालाय तर गावातील काही तथाकथित बांदल डॉ. हितचिंतक त्यांची पताका हातात घेऊन जैय जैयकार करण्यात धुंद होते. परिणाम माझा आवाज एकटा पडला. परिणाम चुकीच्या गोष्टी माझ्यानावावर खपवण्यात आल्या. की मी पैसे न देताच पळून चाललो होतो. इतके तुम्ही नालायक वागताल याची मला अपेक्षा न्हवती. गावातील तथाकथित मंडळी तर बोलत होती गावातील लोकांच्या सेवेसाठी आम्ही त्यांना गावात हॉस्पिटल टाकायला लावले आहे असे म्हणत होते. ही अशी सेवा गावातल्या लोकांना द्यायची होती काय? जो गावातल्या लोकांबरोबर असं वागू शकतो तो बाहेरच्या लोकांचं किती शोषण करीत असेल. मी सगळ्या गोष्टींचं समर्थन करू शकतो पण चुकीच्या गोष्टींच समर्थन कधीच करू शकत नाही.

कारेगावमधील बनावट डॉक्टरचा आणखी एक 'प्रताप' उघडकीस

मी ही सगळी घटना आमदार अशोक पवार यांना सुद्धा सांगितली. त्यांनी मला सांगितले तू नीट होऊन ये मग आपण काय असेल ते बघू. आणि पाहतो तर काय दोन दिवसांनी राजू पाटील आणि अशोक पवार हे बांदल हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे चांगले फोटो काढून त्यांच्या जयजयकार करून बांदल हॉस्पिटलची पताका फडकवुन आले. त्यांना शुभेच्या देऊन आले आणि मी पैसे न देता पळून चाललो होतो अशी मैफिल रंगवून आले. त्याच क्षणी हे दोन्ही नेते माझ्या डोक्यात गेले. मला वाटलं मला काहीतरी मदत करतील पण वेगळंच घडलं. असो. पण ह्या अशा ह्या गैरप्रकारामुळे मी अस्वस्थ झालोय. आपलीच माणसं , आपल्यालाच खात होते. दात आपलेच होते आणि होठ ही आपलेच. शेवटी सामान्य माणसाचे कोणी नसतं. जिकडे पैसे तिकडे सत्तेची भुतं नाचत असतात. मी सत्ता ही पहात होतो, पैसा ही पहात होतो आणि त्याच्या नशेत नाचणारी भुतं सुद्धा!

अल्पवयीन मुलगी राहिली साडेपाच महिन्याची गरोदर...

काहींच्या भावना दुखावल्या असतील मला त्याची पर्वा नाही. ज्या प्रसंगातून मी गेलो तो मनाला पीळ आणणारा होता. मानसिक खच्चीकरण करणारा होता. आणि मानवतेवरून विश्वास उठवणारा होता.

- वैभव चौधरी

दरम्यान, वैभव चौधरी यांनी आपला अनुभव फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल केल्यानंतर अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त झाले आहेत. www.shirurtaluka.com ने याबाबत बांदल हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ उल्हास बांदल यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Title: vaibhav chaudhari write bandal hospital karde corona exprenc
प्रतिक्रिया (1)
 
Bapu kale
Posted on 22 May, 2021

माझी आई बांदल हॉस्पिटल मध्ये 16 दिवस admit होती, 0 स्कोअर असताना तिला 6 रेमदिसिवर ची इंजेक्शन आणायला लावली, माझी आई चालत जाऊन admit झाली होती पण आज तिची अवस्था खूप दयनीय आहे, डॉक्टर म्हणजे देव, पण पैशासाठी असली माणसे किती नीच वागतात याची प्रचिती आम्हाला पण आली आहे मी डॉक्टरांचे सर्व बिल भरले आहे