गावातील नागरिक लसीकरणपासून वंचित राहणार नाही: रमेश गडदे

शिक्रापूर: सध्या लसीकरण म्हणजे महत्वाचा घटक बनलेला असून गावातील नागरिकांना लसीकरण उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, तसेच गावातील कोणताच नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी देखील प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रतिपादन सरपंच रमेश गडदे यांनी केले.

शिक्रापूर: सध्या लसीकरण म्हणजे महत्वाचा घटक बनलेला असून गावातील नागरिकांना लसीकरण उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, तसेच गावातील कोणताच नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी देखील प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रतिपादन सरपंच रमेश गडदे यांनी केले.

काँग्रेस सेवादल प्रत्येक निवडणुकीत उतरणार: अशोक भुजबळ

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे जॉन डीअर कंपनी व आदित्य बिर्ला हॉस्पिटलयांच्या माध्यमातून दोन हजार नागरिकांना लसीकरण मोहीम सुरु करण्यात आलेली असतान त्यावेळी बोलताना सरपंच रमेश गडदे बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे, उषा राऊत, सामाजिक कार्यकर्ते तानाजी राऊत, जॉन डीअर कंपनीचे सतीश कवाद, किरण फंड, आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे सचिन समेळ, हरीश पाटील, शामसुंदर सैनी, दीक्षा तुपे, मयुरी राणीम, झीनत शेख, रवी खरात, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयचे बाबुराव कर्डिले, प्रिया जाधव, लाला मोरे, मयूर तक्ते, महेश शिर्के यांसह आदी उपस्थित होते.

समाज घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण: प्रकाश कुतवळ

दरम्यान यावेळी बोलताना नागरिकांच्या आरोग्याच्या हेतूने शक्य तितक्या जास्त लस उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असून नागरिकांनी लसीकरणचा लाभ घेण्याचे आवाहन करत गावातील एकही नागरिक लसीकरण पासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर यांनी केले तर ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी आभार मानले.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Villagers will not be deprived of vaccination Ramesh Gadde