...म्हणून भरमंडपात नवरदेव पडला नवरीच्या पाया!

वधूच्या पाया पडणाऱ्या नवरदेवाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण, या फोटोमागील खरी स्टोरी समजली तर तुम्हाला या नवरदेवाचे फक्त कौतुक नाही तर त्याचा अभिमान वाटेल.

मुंबई : पती परमेश्वर म्हणून पत्नी आपल्या नवऱ्याच्या पाया पडत असल्याचे आतापार्यंत पाहात आलो आहोत. पण, एका नवरा आपल्या बायकोच्या पाया पडला आहे. तो पण भरमंडपात. नवरीच्या पाया पडतानाचे नवरदेवाचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

कांताबाई सातारकर यांच्या पाठोपाठ नातवाचा कोरोनामुळे मृत्यू

सोशल मीडियावर अनेक छायाचित्रे व्हायरल होत असतात. त्यातील काही मजेशीर असतात तर काही आपले मन जिंकणारे असाच हा हृदयस्पर्शी फोटो आहे. वधूच्या पाया पडणाऱ्या नवरदेवाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण, या फोटोमागील खरी स्टोरी समजली तर तुम्हाला या नवरदेवाचे फक्त कौतुक नाही तर त्याचा अभिमान वाटेल.

डॉ. अजित वरवांडकर यांनी हे छायाचित्र आपल्या ट्विटरवर शेअर केले आहे. त्यांनी हा फोटो शेअर करत म्हटले आहे की, वधू-वराने एकमेकांना वरमाला घातल्यानंतर नवऱ्याने आपले डोके वधूच्या पायावर टेकवले. लग्नातील उपस्थित कुटुंबं, नातेवाईक आणि वऱ्हाडी हे पाहून स्तब्धच झाले.

डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

May be an image of text

युवतीचा मृतदेह शवविच्छेदन विना चार तास रुग्णवाहिकेत...

पुढे नवऱ्याने असे का केले? याचे उत्तर दिलं. तेसुद्धा या पोस्टमध्ये डॉ. अजित यांनी सांगितले आहे. ते पुढीलप्रमाणे...

ही माझा वंश पुढे चालवणार आहे.

माझ्या घरात लक्ष्मी आणणार आहे.

माझ्या आई-वडिलांचा सन्मान करणार आहे, त्यांची सेवा करणार आहे.

मला वडिल होण्याचा आनंद देणार आहे.

प्रसूतीवेळी माझ्या मुलासाठी मृत्यूच्या दारात जाऊन येणार आहे.

तिच्यामुळे माझ्या घराचा पाया आहे.

तिच्यामुळेच समाजात माझी ओळख असेल.

आपल्या आई-वडिलांना सोडून ही माझ्यासाठी माझ्या मागे आली.

आपल्या माणसांसोबत नातं तोडून तिनं माझ्याशी नातं जोडलं.

जर ती इतकं सर्वकाही करू शकते, मग आपण तिला थोडासा सन्मान नाही देऊ शकत का? जर या महिलांच्या चरणी आपले शीर झुकवणे हास्यास्पद आहे तर मला जगाची पर्वा नाही, असे या नवरदेवाने सांगितले. दरम्यान, या नवरदेवावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बहिणीच्या दशक्रियेदिवशीच कोरोनाने घेतला भावाचाही बळी...

Image

सरकारचा खासगी हॉस्पिटल्सना दणका, कोविड उपचारासाठी दर जाहीर

सरकारचा खासगी हॉस्पिटल्सना दणका, कोविड उपचारासाठी दर जाहीर

शिरुर तालुक्यातील कोरोना रुग्णाने शेअर केला हॉस्पिटलमधील धक्कादायक अनुभव...

शिरूर रेशनिंग दुकानदार आणि पुरवठा विभाग यांचे आर्थिक साटे-लोटे?

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: wedding time groom touches bride footestep groom bowed his h
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे