कोण होतास तू, काय झालास तू,अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू...

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठीतील कविता म्हणत त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. राऊत यांची अवस्था कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू, अशी झाली असल्याचे फडणवीस म्हणाले

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठीतील कविता म्हणत त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. राऊत यांची अवस्था कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू, अशी झाली असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच शिवसेनेकडून मुस्लिमांचे लांगूलचालन केले जात आहे, आता बाळासाहेब जनाब असा उल्लेख केला जातो, असे म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

तरुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी विविध उपाययोजना राबविणार...

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ८ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले. त्यात त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार सुरु असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मोर्चे निघाले. कुणाच्या ध्यानीमनी नसता इतके मोठे मोर्चे कसे काय निघतात? नियोजनाशिवाय हे मोर्चे निघणे शक्यच नाही. नियोजन झाले असेल तर सरकार, आयबी, गुप्तचर, पोलिसांनी कसे काय माहित नाही, असा सवाल त्यांनी केला.

आशुतोषने अरुंधती समोर ठेवला 'हा' प्रस्ताव

सरकारच्या समर्थनाने हे मोर्चे निघाले. हा पद्धशीरपणे पोलरयाझेशनचा प्रयोग असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तसेच या मोर्चामध्ये निवडून हिंदूंची दुकाने जाळली गेली. दुकान कुणाचेही जाळणे ते चुकीचेच. मात्र, या साऱ्या हिंसाचारावर महाविकास आघाडींच्या नेत्यांची तोंडे शिवली गेली. त्यात संजय राऊतांची अवस्था कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू, अशी झाल्याची जहरी टीका फडणवीस यांनी केली.

शिरुर तालुक्यात विद्युत वितरणकडून थकीत वीजबिल वसुली मोहीम सुरु

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Who would have been you what were you what were you how d