'वटपौर्णिमा' का साजरी केली जाते...?

भारतीय संस्कृतीत वडाचे झाड हे पूजनीय मानले जाते. निसर्गतः दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वड, पिंपळ या वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी आणि पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. त्याच्या या अस्तित्वामुळे स्त्रिया झाडाला सौभाग्याचे साकडे घालतात.

रांजणगाव गणपती: भारतीय संस्कृतीत सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या सर्व सणांपैकी वटपौर्णिमा हा एक सण असुन हा विवाहित स्त्रियांचा महत्त्वाचा सण आहे. यावर्षी वटपौर्णिमा गुरुवारी २४ जून रोजी आली असून हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विवाहित स्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. भारतीय संस्कृतीत वडाचे झाड हे पूजनीय मानले जाते. निसर्गतः दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वड, पिंपळ या वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी आणि पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. त्याच्या या अस्तित्वामुळे स्त्रिया झाडाला सौभाग्याचे साकडे घालतात.

विवाहित स्त्रिया आपल्या पतिला झाडांच्या नैसर्गिक गुणांप्रमाणे उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा व प्रार्थना करतात. या दिवशी स्त्रिया हळदी-कुंकू, अक्षता वाहून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तसेच आंबे आणि दूध- साखरेचा नैवेद्य दाखवतात. वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून ५ प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर सुवासिनी एकमेकींची ओटी भरतात अशा पद्धतीने वटपौर्णिमेचे हे व्रत पार पाडले जाते. पर्यावरणाच्या दृष्टीतून वडाच्या झाडाचे महत्त्व असल्यामुळे त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा एक पूजेचा हेतू आहे. वटवृक्ष हे शिवरुपी आहे. शिवरुपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे शिवरुपी पतीलाच समजून, ईश्‍वराची पूजा करणे, असे मानले जाते. ही भावना मनात ठेवून सर्व स्त्रिया हा सण उत्साहाने साजरा करतात. या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा बेत केला जातो, अशा गोड पक्वानांचा बेत करुन तोंड गोड करुन हा सण साजरा केला जातो. पूजेचे व्रत पूर्ण करुन निसर्गातील झाडांचे संवर्धन करणे हाच त्याचा एकमेव हेतू आहे.

भद्र नामक देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती. उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा पुत्र होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याची माहिती होते. त्यामुळे सत्यवानाशी विवाह न करण्याचा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला आणि जंगलात नवऱ्या बरोबर राहून सासू-सासर्‍यांची सेवा करु लागली.

सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा ३ दिवसावर येऊन ठेपला तेंव्हा तिने ३ दिवस उपवास करुन सावित्री व्रतचा आरंभ केले. सत्यवानाच्या मृत्यूच्या दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला गिहिरी आली व तो जमिनीवर पडला यमराज तिथे आले आणि सत्यवानाचे प्राण नेऊ लागले सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने या फॉस्टी साठी नकार दिला आणि आपल्या पतीसह जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पति सोडुन तिला ३ वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले. तिसरे वरदान मागताना मला पुत्र प्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. यमराजाने तथास्तु, असे म्हटले आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागेल.  

सावित्रीने तिच्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली आणि यमदेवाने सत्यवानाचे प्राण परत दिले. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमलोक गाठलं तेव्हापासून या व्रत्ताची सुरुवात झाली. सत्यवानाचे प्राण याच दिवशी परत आणले ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी पौर्णिमा होती म्हणुन वटपौर्णिमा हा सण साजरा केला जात असुन या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन या दिवशी केली जाते.

Title: Why is Vatpoornima celebrated