महिलेने नवऱयाला पकडले रंगेहाथ; पण कसे पाहा...

महिलेने खोलीचा दरवाजा ठोठावला. आतमध्ये तिच्या पतीचा कोण आहे? असा आवाज आला. तिने स्वत:चे नाव सांगितले.

भोपाळ (मध्य प्रदेश): महिलेचा नवरा दुसऱ्या मुलीसोबत एका खोलीत होता. याबाबतची माहिती महिलेला समजली. तिने सर्वात आधी याबाबत पोलिसांना माहिती दिली. तिने पोलिसांना फोन करुन घटनास्थळी बोलावून घेतले. शिवाय, पत्रकारांनाही बोलावून घेतले. काही नातेवाईकांच्या उपस्थितीत नवऱयाला रंगेहाथ पकडल्यावर मोठा गोंधळ निर्माण झाला. ही घटना आगर मालवा जिल्ह्यात घडली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा माजी मंत्र्यावर लैंगिक शोषण अन् गर्भपाताचा आरोप

सर्वजण घटनास्थळी जमल्यानंतर महिलेने खोलीचा दरवाजा ठोठावला. आतमध्ये तिच्या पतीचा कोण आहे? असा आवाज आला. तिने स्वत:चे नाव सांगितले. पतीने दार उघडल्यानंतर त्याच्यासोबत मुलगीही खोलीत दिसली. दोघांना एकत्र पाहून उपस्थितांना धक्का बसला.नवरा दुसऱया मुलीसह रंगेहाथ पकडला गेला. यावेळी तेथील स्थानिक पत्रकारांनी आणि इतर नागरिकांनी मोबाईलचा कॅमेरा सुरु केलेला होता. महिलेने वेळेचा विलंब न करता थेट स्वत:च्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिचा पती जीव वाचवून इकडेतिकडे पळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र संतापलेली महिला ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती.

शिरूर तालुक्यातील मेव्हणीला खूश करण्यासाठी केले नको ते कृत्य...

Image

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; शिवाय...

विशेष म्हणजे हा सर्व गदारोळ पोलिसांच्या समोर घडत होता. महिलेने आधी पतीला मारहाण केली. त्यानंतर ती पतीच्या प्रेयसीलाही मारहाण केली. उपस्थितांनी महिलेला अडवण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलिस सर्वांना गाडीत भरुन पोलिस ठाण्यात घेऊन गेले. तिथे त्यांनी महिलेची आणि पतीची समजूत घातली. त्यानंतर हे प्रकरण निवळले. याबाबतची चर्चा परिसरात रंगली असून, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

Image

शिरूर रेशनिंग दुकानदार आणि पुरवठा विभाग यांचे आर्थिक साटे-लोटे?

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: wife beat husband after caught with another woman in room
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे